देवगाव जि.प.शाळा,सामाजिक सभागृहाचे बांधकाम अंदाज पत्रकाप्रमाणे करुन घेणार -- उपअभियंता संजय पवार
-------------------------------------------------
केज दि.१६ (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परीषद शाळा वर्ग खोल्या बांधकाम आणि मोरे वस्तीवरील सामाजिक सभागृहाचे बांधकाम अंदाजपत्रका प्रमाणे करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी सात वाजल्यापासून केज पंचायत समिती परीसरात आमरण उपोषण महादेव गायकवाड,विक्रम मुंडे यांनी सुरु केले होते.या उपोषणाची केज पंचायतीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पवार यांना सांगताच पवार उपोषण स्थळी थेट धाव घेऊन देवगाव येथील जि.प.शाळा आणि मोरे वस्तीवरील सभागृहातील झाडाचा अहवाल वरीष्ठांना पाठवणार व सुरु असलेले बांधकाम अंदाज पत्रकाप्रमाणे करुन घेणार असल्याचे लेखी पत्र उप अभियंता संजय पवार यांनी उपोषणकर्ते महादेव गायकवाड यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून केज तालुक्यातील देवगाव येथील जि.प.शाळेच्या चार वर्ग मंजूर आहेत.यापैकी केवळ दोनच वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू असलेले व मोरे वस्तीवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम हे अंदाज पत्रका प्रमाणे करावे,या मागणीसाठी स्वतंत्र दिनी दि. १५ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी सात वाजल्यापासून केज पंचायत समितीच्या परीसरात महादेव गायकवाड व त्यांचे सहकारी विक्रम मुंडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पवार यांनी उपोषणार्थी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून एक लेखी पत्र दिले असून जि.प.शाळेच्या सुरु असलेल्या दोन नंतर सुरू होणाऱ्या दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम व मोरे वस्तीवरील सभागृहात बांधकामात असलेल्या वडाच्या झाडाची पाहणी करणार व येथील अहवाल वरीष्ठांना देणार व बांधकाम अंदाज पत्रकानुसार मी स्वतः लक्ष घालून करून घेणार असल्याचे लेखी पत्र केज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पवार,कराड,खांडेकर यांनी दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव,धनंजय कुलकर्णी,हनुमंत भोसले,दत्ता धस,भगवान केदार,गौतम बचुटे रिपाइंचे भास्कर मस्के,राहूल सरवदे,बाळासाहेब ओव्हाळ या ठीकाणी उपस्थित होते.
stay connected