रक्षाबंधन;नात्याला पैशात मोजु नये
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार)
राखी.........भावाबहिणीच्या नात्याचं पवित्र बंधन.बहिण भावाला राखी बांधते,भाऊही तिच्याकडुन हे पवित्र बंधन बांधुन घेतो.खरं तर आजच्या काळात तिची राखी म्हणजे तिचं रक्षासुत्र असतं.त्याचंही रक्षासुत्र......त्या राखीच्या एका साध्या धाग्यानं भाऊ बहिणीला सात जन्मापर्यंत रक्षा करण्याचं वचन देतो.
पुर्वी रक्षासुत्र बहिण भावाला बांधत नव्हती.तर भाऊ बहिणीला बांधायचा.मातृसत्ताक कुटूंबपद्धती असल्याने ही प्रथा अस्तीत्वात होती.स्रीयांना मानाचा दर्जा होता.तीच भावाचं रक्षण करीत असे.कालांतरानं पुरुषसत्ताक कुटूंबपद्धती आली आणि स्रीयांना गौण स्थान निर्माण झालं.स्रीयांना त्यानंतर उपभोग्य वस्तु मानल्या गेली.त्यानंतर अत्याचाराच्या चरणसीमेने कळसच गाठला.तद्नंतरच्या काळात स्रीया आपली सुरक्षा व्हावी म्हणुन रक्षासुत्र बांधु लागली.त्याला पुढे राखी नाव पडलं.
आज हे जरी खरं असलं तरी आजचा भाऊ बहिणीचं रक्षण करेलच असं नाही.भाऊ आपल्या स्वार्थापोटी रक्ताचं नातं संपवायला लागला आहे.बहिणही रक्ताचं नातं संपवत चालली आहे.हे सगळं स्वार्थासाठी घडत आहे.जमीनीच्या किंमती वाढल्याने नात्यात दुरावे निर्माण झाले आहेत.रक्ताचं नातं संपवुन आजची बहिण केवळ हिस्सा मागत आहे.भावाने हिस्सा नाही दिल्यास मारपीट,कोर्टकचेरी,पोलिसस्टेशन च्या तक्रारी सा-या भानगडी करण्यास आजच्या बहिणी मोकळ्या......अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
आजचे भाऊही तसेच आहेत.तेही बहिणीची मदत करण्याऐवजी तिला सतत त्रास देत असतात.नव्हे तर आजचे भाऊ हात उचलुन तिला मदत तर करीत नाही.उलट तिचा हक्कही हिसकावुन घेतात.पण यात काही अपवाद असतात.इथे रक्ताचं नातंच राखीचं बंधन पाळत नाही.तिथे फेसबुकवर मिळालेले बहिण भाऊ त्यांच्या नात्याचं काय?
फेसबुकच्या बहिणीवर जरा प्रेम करुन पहा.तुम्हाला रक्ताच्या नात्यापरसही जास्त प्रेम देईल त्या माऊली.एक प्रकारे रक्ताचं नातं सोडुन जाईल तुम्हाला.पण फेसबुकवर मिळालेले भाऊ बहिण तुम्हाला कधीच सोडुन जाणार नाहीत.मात्र तुम्ही त्यासाठी नैतिकतेचे पाईक असले पाहिजे.
अमन एक दुःखी व्यक्ती होता.संसारातुन पुर्ण उदास झालेला असा गृहस्थ.त्याला तीन बहिणी होत्या.त्याही नावापुरत्या.बाप मेल्यानंतर संसाराचा गाडी रेकतांना त्यालाही अडीअडचणी येत होत्या.तसा तो फार गरीब होता.पैशानही आणि सन्मानानही.अशातच सोबतीला असलेली काही शेती करुन तो उदरनिर्वाह करीत असे.
त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते.त्यांना अति श्रीमंत घराणं मिळालं होतं.त्यांच्या घरी नोकर चाकर,गाडी बंगले सगळं होतं.त्यामानाने अमनजवळ काहीच नव्हतं.पण तरीही त्या बहिणी अमनच्या सुखी संसाराला जळत होत्या.अमनजवळ असलेली शेती त्यांना खुपत होती.असेच काही दिवस गेले.
आज शेतीच्या किंमती वाढल्या होत्या.त्यामुळे की काय बहिणीची नजर या जमीनीवर गेली.त्यांनी भावाला हिस्सा मागितला.पण भावाने तो नाकारला.कारण त्याचं पोट भरण्याचं साधन म्हणजे ती शेती होती.शिवाय बहिणी श्रीमंतही.
जमीनीचा दर वाढल्यानं या बहिणीची नजर त्या जमीनीवर खिळली.त्यातच भाऊ ब-या बोलानं देत नाही हे गृहीत धरुन त्या गर्भश्रीमंत बहिणींनी त्याचेविरोधात न्यायालयात खटला दाखल केला.नातं नष्ट झालं.पैसा श्रेष्ठ आणि मोठा ठरला.त्यांचा विजय झाला.सा-या शेताचे तुकडे झाले.जणु त्याला त्यावेळी स्वतःचे तुकडे झाल्यागत वाटायला लागलं.
त्या रक्ताच्या बहिणी होत्या.तरीपण त्यांनी पैशासाठी आज नातं संपवलं होतं त्यांनी नात्याला पैशात मोजलं होतं.सख्खा भावाला जमीनीच्या तुकड्यागत त्याच्या ह्रृदयावर वार करुन संपवलं होतं.
आज त्या बहिणी बोलत होत्या त्याचेशी.....
तोही बोलत होता.पण तो गोडवा नव्हता.त्यातच अमन फेसबुकवर बहिण शोधु लागला.रक्ताच्या जरी नसल्या तरी रक्ता परसही स्वभावाने मोठ्या असलेल्या.कोणी सांगत होते,फेसबुकवर काही बहिण मिळते का?फेसबुकवर सापडणारी मंडळी ही खरी नसतात.पण त्याला त्याचं मन सांगत होतं,की आपण चांगलं तर जग चांगलं.कधीतरी सापडेलच बहिण.
फेसबुकवर मित्रविनंती पाठविल्यावर एक मुलगी बोलायला लागली.त्याने तिच्याशी बोलता बोलता न्याहाळलं की ती स्वभावाने चांगली असुन गरीब नाही.ती श्रीमंत आहे.पण अमनने तिची परीक्षा पाहताच तिनं गरीब असल्याचं सांगितलं.गरीबी श्रीमंती ही काही पैशानं मिळत नाही.नातं पैशात मोजु नये असंही त्याला वाटत होतं.
फेसबुकवर मिळालेली ही बहिण त्याला फार चांगली वाटली.कारण बोलता बोलता ती सहज बोलुन गेली.दादा मी तुला राखी पाठवणार.अमनला ते बरं वाटलं.कारण तो तर बहिण शोधतच होता.
आज अमन मेहनतीनं श्रीमंत बनला होता.त्याला एक सरकारी नोकरीही होती.पण फेसबुकवर सापडलेली बहिण गरीब असल्याचं कळताच तिला वाईट वाटू नये म्हणुन तो गरीब असल्याचंच सांगत होता.तसं पाहता तो फारसा श्रीमंत नव्हताच.
आज रक्षाबंधनचा दिवस होता.या फेसबुकच्या बहिणीनं राखी पाठवली होती.त्याला अतिशय आनंद झाला होता.ती गरीब असली तरी राखी मिळताच जगातील खुप श्रीमंत बहिण वाटली.कारण आजची तरुणाई नात्याचा शिरच्छेद करते.ती तरुणाई नातं जपत नाही.राखी तर दुरच......
ती दुर सातसमुद्रापलिकडे जरी असली तरी ती ताई फार जवळची वाटलीय त्याला.रक्षाबंधनाचा धागा हा कितीतरी मोठ्या किंमतीचा असतो.त्याला मोलच नाही.त्याची किंमत पैशात मोजता येत नाही.हे त्याला समजुन चुकले होते.
फेसबुकच्या या बहिणीची माया त्या राखीच्या धाग्यापरस मोठी होती.राखी प्राप्त होताच त्यानं बहिणीला कळवलं.बहिणीलाही आनंद झाला.त्या बहिणीनं तो त्याला जीवंत असेपर्यंत राखी पाठवणार याचं आश्वासन दिलं होतं.
त्याच्या डोळ्यातुन आनंद प्रसवु लागला होता.त्याला गहिवरुन येत होतं रक्ताच्या नात्यापेक्षा हे प्रेमाचं नातं फार मोठं वाटू लागलं होतं.कारण त्या स्वार्थानं एकीकडे रक्ताचं नातं संपवलं होतं तर फेसबुकनं दुसरीकडे मायेचं नातं निर्माण केलं होतं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
stay connected