खा.सुप्रियाताई सुळे यांनी कोरोनायोद्धा अशोक पोकळे यांच्या कार्याचे केले कौतुक
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथीलकोरोना योद्धा सरपंच अशोक पोकळे यांनी मागील दोन वर्षांच्या काळामध्ये कोरणा रुग्णांची केलेली सेवा व त्यांचे या काळातील धाडशी काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा सरपंचअशोक पोकळे यांनी मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना स्वतःघरून उचलून आणून दवाखान्यात ऍडमिट करणे,कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस करणे त्यांना आवश्यक असलेले साहित्य स्वखर्चातून देणेएवढेच नाही तर स्वतः कोरोना रुग्णांना जेऊ घालणे व त्यांच्या अडचणी च्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी उभा राहणे अशा विविध भूमिका सरपंच अशोक पोकळे1 यांनी गेल्या कोरोनाच्या काळामध्ये निभावल्या आहेत, त्यांच्या कार्याची व धाडसाची दखल घेत नामदार धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी त्यांनाकोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांना बोलावून घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
stay connected