महाजनवाडी गावात विनामूल्य आरोग्य सेवा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 महाजनवाडी गावात विनामूल्य आरोग्य सेवा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 




______________________________ ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आयोजित विनामूल्य तपासणी व औषधोपचार शिबिर अंतर्गत आज दि.6 जुन रविवार रोजी बीड तालुक्यातील महाजनवाडी गावात आरोग्य सेवा देण्यात आली. 


ग्रामीण भागातील कोरोना आजाराविषयी गैरसमजातुन वयोवृद्ध महिला, पुरूष तसेच अडाणी माणसं दवाखान्याविषयी मनात भिती बाळगुन असून अंगावर दुखणे काढत असून दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत त्याचबरोबर लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीबा ग्रामस्थांना आर्थिक टंचाई भासत असल्यामुळेच दवाखाना व औषधीदुकान नसलेल्या ग्रामीण भागातील वाड्यातांड्यावर जाऊन कोरोनाविषयक जनजागृती व मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येत असून आज बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी गावात नवनिर्माणाधिन मारोती मंदिराच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत आरोग्य सेवा देण्यात आली. 

   यावेळी या उपक्रमास दत्ता घरत, श्रीराम घरत,दिपक जगदाळे, कमलाकर गिरी, प्रकाश यादव, दिलीप घरत, तुळशीराम घरत, वैजिनाथ घरत, महावीर बोराडे आदिंनी सहकार्य केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.