*म्युकर मायकोसिसच्या तपासणी शिबीरात ५८ नागरिकांची तपासणी*

 *म्युकर मायकोसिसच्या तपासणी शिबीरात ५८  नागरिकांची तपासणी*

_______________________________


कर्जत:

       कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या म्युकरमायकोसिस समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० ते २ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रुग्णांनी शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.या शिबिरात सहभागी झालेले कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव मदने, दंत चिकित्सक डॉ.साकेत जगदाळे,दंत चिकित्सक डॉ.किरण शेंडे,नेत्र तज्ञ डॉ.प्रिया दराडे-बडे आदींनी म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. या रोगाची नेमकी लक्षणे काय आहेत?त्यासाठी नेमकी काय व कशी काळजी घ्यावी?याबाबत उपस्थितांचे समुपदेशन केले.सध्या तालुक्यातील कोरोनाच्या प्रादूर्भावाची आकडेवारी कमी झाली असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णांचे तात्काळ निदान व्हावे त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी आ. रोहित पवारांनी अनेक उपाय योजना केल्या आहेत.आरोग्याबाबतची अनेक उपकरणे स्वतः उपलब्ध करून दिली आहेत तर त्यांच्या आवाहनातूनही अनेक मदत कोरोना रुग्णांना झाली आहे.असे असले तरी म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव होऊ नये या नव्या आजारात नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये.

      यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे रझ्झाक झारेकरी,डॉ. शबनम इनामदार,भास्कर भैलुमे,सचिन कुलथे,सतीश पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

---------

प्रतिनिधी अस्लम पठाण कर्जत अहमदनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.