*सराटे वडगाव येथील नदी खोलीकरण कामाचा माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते संपन्न*
आज दिनांक 5 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सराटे वडगाव येथे नदी खोलीकरण कामाचे लोकार्पण व वृक्षरोपण सोहळा आय सी आय सी आय फाउंडेशन व सराटे वडगाव ग्रामपंचायत यांच्यामार्फत करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मुख्य अतिथी माननीय आनंद भंडारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीड व माननीय मुंडे गट विकास अधिकारी आष्टी उपस्थित होते. माननीय भंडारी साहेबांनी आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत केल्या गेलेल्या नदी खोलीकरण कामाचा आढावा घेतला त्यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करत सर्व ग्रामस्थांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे सुचवले. फाऊंडेशनचे दीपक पाटील प्रकल्प व्यवस्थापक यांनी आय सी आय सी आय फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली.आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत आष्टी व पाटोदा तालुक्यातील 10 गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यामध्ये ग्रामीण उपजीविका आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण मृद व जलसंधारण तसेच वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट विषयी थोडक्यात माहिती दिली. माननीय आनंद भंडारी साहेबांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व कौशल्य विकास प्रशिक्षण काळाची गरज आहे असे सांगितले. सरपंच प्राध्यापक राम बोडके सर यांनी गावाच्या कामाचा आढावा दिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय फाऊंडेशनचे विकास अधिकारी चेतन पाटोळे,समन्वयक यशवंत बहिरम, दशरथ सोनवणे व सराटे वडगाव आनंदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Nice working ☺️
उत्तर द्याहटवाstay connected