*मा. आ. बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पथदिवे बसवले*
कडा प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत ऊंदरखेल येथे आमदार आमदार बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पथदिवे बसविण्यात आले याविषयी सविस्तर माहिती अशी की ऊंदरखेल ग्रामपंचायत अंतर्गत सौर ऊर्जा वरील सात पथ दिवे बसवण्यात आले त्यामध्ये महादेव गड, भैरवनाथ मंदिर, मज्जिद आणि वस्ती यांचा समावेश आहे यावेळी उपस्थित माजी सरपंच हरिभाऊ दहातोंडे, सरपंच अंकुश वामन, नवनाथ दहातोंडे, वाघमारे, सैयद अब्दुल, बरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत च्या वतीने आभार मानण्यात आले
stay connected