संपादक रविंद्र तहकीकवर हल्ला करणा-यांवर पञकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करावी-उत्तम बोडखे
—————————————————————
पञकारांवर हल्लाचा आष्टी तालुका पञकार संघाकडून जाहिर निषेध
————————————————————
आष्टी(प्रतिनिधी)-दै.लोकपञचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांच्यावर रविवार दि.30 रोजी काळीशाही टाकून धक्काबुक्की करणा-यां राजकारणी गुडांवर पञकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पञकार उत्तम बोडखे यांनी केली आहे.
आष्टी तालुका पञकार संघाच्यावतीने आज मंगळवार दि.1 रोजी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे यांना दै.लोकपञचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांच्यावर झालेल्या निषेधाचे निवेदन आज सोशल डिस्टंन्सिंग पाळून मोजक्याच पञकारांच्या उपस्थितीत देण्यात आले.यावेळी जेष्ठ पञकार उत्तम बोडखे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,सध्या पञकारीता करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे काम झाले आहे.पञकारांवर सतत हल्ले होत असून,यावर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.परवा लोकपञचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांनी आपल्या वृृृृृृत्तपञात राज्याचे माजी मुख्यमंञी नारायण राणे व पुञाची वास्तवादी विचार व्यक्त केले होते.त्यामुळे राणे समर्थकांनी संपादक तहकीक यांच्या अंगावर शाही फेकून,धक्काबुक्की केली.ही खुप निंदनीय गोष्ट आहे.परंतु पञकारांवर असा हल्ला करणा-यांना पञकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी असेही ते म्हणाले.तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर जेष्ठ पञकार उत्तम बोडखे,गणेश दळवी,प्रविण पोकळे,सचिन रानडे यांच्यासह आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
आष्टी-येथील नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे यांना निवेदन देतांना जेष्ठ पञकार उत्तम बोडखे यांच्यासह इतर दिसत आहेत.
stay connected