लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची साध्या पध्दतीने जयंती साजरी

लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची साध्या पध्दतीने जयंती साजरी



आष्टी/प्रतिनिधी

युवराज खटके


आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील बुद्ध विहार येथे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पुण्यश्लोक लोकमता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. यावेळी बोलताना.सामाजिक कार्यकर्ते,धनराज खटके सर यांनी सांगितले की अहिल्यादेवी ने भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली,गोरगरिबांसाठी अन्नछत्रा लय काढले अनाथ मुलांसाठी आश्रम काढले रस्ते तलाव घाट बांधले हे त्यांच्या कालावधीमध्ये सक्षम पणे कसा राज्यकारभार करायचा हे त्यांनी दाखवून दिले.यावेळी उपस्थित प्रा,दादा विधाते,माजी,प,स,सदस्य,संजय धायगुडे,युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष व पत्रकार,युवराज खटके,मा.उपसरपंच,सुभाष भवर मा,ग्रा,सदस्य नामदेव आरुण,बाळासाहेब दिंडे,मेहेत्रे प्रशांत,जिवन शिंदे,लक्ष्मण गायकवाड,अनिल लोखंडे,पै,आरुण हे उपस्थित होते.यावेळी पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.लोक कल्याणकारी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी महिला महाराणी समाजामध्ये महिलांची फौज निर्माण करणारी एक महिला महाराणी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती कोरूना या महामारीमुळे साध्या पद्धतीने साजरी केले.शाळेचे प्राचार्य.विधाते सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.यावेळी उपस्थित उपसरपंच,रामदास शेंडगे,अमोल काकडे,भाऊसाहेब जगधने,कुलांगे सर,शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.