पाटोदा ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उदघाटन प्रसंगी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी रुग्णांसाठी औषधे व इंजेक्शन दिले भेट
----------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी): ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे पन्नास ऑक्सिजन बेडचे उदघाटन करताना मा.आ.भीमसेनजी धोंडे साहेब, आ.बाळासाहेब आजबे काका, मा.मेहबूब शेख, रामकृष्ण बांगर, सभापती सुवर्णाताई लांबरुड, अनुरथ सानप, देविदास शेंडगे, बाळासाहेब पवार, शिवसेना ता.अध्यक्ष राहुल चौर, शिवभूषण जाधव, आप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, डॉ.शिवाजी राऊत, जुबेर चाऊस, गणेश कवडे यांच्यासह पाटोदा तालुक्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव व पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सर्व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मा.आ.भीमसेनजी धोंडे साहेब यांनी रुग्णालयात उपलब्ध नसेलेले औषधे व इंजेक्शन पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिले आहेत. यामुळे आता रुग्णालयातील रुग्णांना औषधे बाहेरून विकत घेण्याची गरज पडणार नाही.
stay connected