आ.सुरेश धस यांचा बीड जिल्हा दौरा मुंडे,जोशी,शेटे,बडे,गुट्टे,फड,चव्हाण यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन.
आष्टी (प्रतिनिधी) आ.सुरेश धस यांनी सोमवारी बीड जिल्हा दौरा केला यावेळी त्यांनी
माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख असणाऱ्या ओमप्रकाश शेटे,आ.रत्नाकर गुट्टे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासु अंगरक्षक स्व.गोविंद नारायण मुंडे,पालकमंञी धनंजय मुंडे यांचे स्विय्य सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यासह आदी कुटुंबियांच्या भेटी घेऊन सांत्वनपर दौरा केला.
यावेळी आ.सुरेश धस यांनी ओमप्रकाश शेटे यांच्या वडीलांचे नुकतेच निधन झाल्यानंतर दिंद्रुड येथे,तसेच उसतोड संघटनेचे सदस्य तसेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचे सहकारी महादेवआण्णा बडे यांचे कोरोनाने काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांच्या कुटुंबियांची त्यांचे मुळ गाव असलेल्या कासारी ता.धारुर येथे तर गंगाखेड मतदारसंघाचे आ. रत्नाकर गुट्टे साहेब यांचे वडील माणिकराव गुट्टे यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.यावेळी त्यांचे मुळगाव दैठणा घाट ता.परळी येथे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासु अंगरक्षक स्व.गोविंद नारायण मुंडे यांच्या कन्हेरवाडी ता.परळी येथे पालकमंञी धनंजय मुंडे यांचे स्विय्य सहाय्यक प्रशांत जोशी,नगरसेवक संजय फड यांचे वडील रखमाजी गोविंदराव फड यांच्या निधनपर परळी येथील फड यांच्या निवासस्थानी तर बावी तांडा ता.वडवणी येथील उसतोड मुकादम तथा उसतोड कामगार ग्रुप लिडर सुंदर जेमा चव्हाण यांचे कोरोनाने निधन झाल्यामुळे या सर्व कुटुंबियांचे आ.सुरेश धस यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेटी घेतल्या.यावेळी आ.धस यांच्यासह लोकनेते गोपीनाथरावजी उसतोड संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप,भारत जगताप परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,कृ.उ.बाजार समिती संचालक माणिक फड,भाजपा युवानेते श्रीराम मुंडे,अजय जोशी,सचिन स्वामी,पत्रकार अनंत कुलकर्णी,रामराव गीते,श्रीराम मुंडे,माणिक फड,नगरसेवक भाऊ कराड,गुणाजी फड आदी उपस्थित होते
stay connected