बँका दलालमूक्त करा शेतकरी संघटनेची मागणी
खरीप2021पिककर्ज वाटप 1जून पासून सुरू होत आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती मिळालेले बरेच शेतकरी अजूनही नवीन पीककर्जापासून वंचित आहेत तसेच नवीन खातेदारही पिकर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
पीककर्ज वाटप करताना बहुतेक बँक शाखेत दलाल आहेत तशी तक्रार शेतकरी संघटनेने बीड जिल्हाधिकारी यांचेकडे 2019ला केली होती त्यावर चौकशी करून संबधीतावर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या.
बहुतेक बँक शाखेत स्थानिक कर्मचारी असतात हे कर्मचारी हस्तक्षेप करत दहाटक्के रक्कम घेतात तसेच ठरावीक स्थानिक नागरिकही यात सामील आहेत.
स्थानिक कर्मचारी फाईल मंजूर करतो, खालची फाईल वर घेतो असे सांगून पैश्याची मागणी करतात तसेच मंजूर फाईलच्या सह्या घेतांना स्टेशनरीच्या नावाखाली पैसे मागणी करतात असा मागील अनुभव आहे. मागील वर्षी तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत कर्ज प्रकरणे दिली गेली त्यातही भ्रष्टाचार झाला कारण त्या फाईल ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहाय्यकाने जमा केल्या व ठरावीक फाईल दाखल झाल्या व बाकीच्या गायब झाल्या हाही अनुभव आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी आज तहसीलदार आष्टी यांचे मार्फत बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात खरीप 2021चे पीककर्ज
दलालाविना तात्काळ वाटप करावे व कर्ज वाटपात हस्तक्षेप करणार्या दलालांचा समूळ नायनाट करावा व जिल्ह्यातील सर्व बँका शाखा दलालमूक्त कराव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदनावर बलभीमराव सूंबरे, रहेमान सय्यद व प्रा. राम बोडखे(सरपंच)यांच्या सह्या आहेत.
stay connected