कुर्डुवाडीत डॉक्टर ची हत्या झाल्याची अफवा
कुर्डुवाडी पोलिसा कडुन महिती देण्याचे अवाहन , खंडणी साठी वैधकिय क्षेत्रास त्रास दिला जात असल्याची शक्यता
कुर्डूवाडी/प्रतिनिधी (राहुल धोका)
कुर्डूवाडी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर बद्दल शहरात अफवांचे पिक पसरले असून येथील कोरोना साठी काम करणारे वैधकीय क्षेत्रातील डॉक्टरांची हत्या झाल्याची अफवाच पसरली होती त्याच प्रमाणे ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरचे हात पाय तोडले असा फोन हि प्रतिनिधी कडे विचारणाकरण्या साठी आला कोरोना साठी काम करणाऱ्या डॉक्टर विषयी अफवा पसरवल्या जात असून जाणीव पूर्वक भीती चे वातावरण निर्माण केले जात आहे कुर्डूवाडी पोलिसा कडे या विषयी विचारणा केली असता त्याच्या कडे या विषयी अजून गुन्हा दाखल केला नाही असे सांगितले अशा अफवा पसरवण्या मागे खंडणी चा प्रकार असावा कोरोना सारख्या रोगावर दिवस रात्र काम करणाऱ्या डॉक्टर बदल अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती शोधून पोलिसांनी करवाई करावी सर्व डॉक्टर ने एकजूटी ने काळ्या फीत लावून निषेध करावा असे जेष्ठ मार्गदर्शक डॉ. विलास मेहता यांनी प्रतिनिधी शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे
तर साह्यक पोलिस निरिक्षक केंद्रे यानी सर्वांना विनंती आहे की डॉक्टर च्या संदर्भात जो कोणी विनाकारण सोशल मीडिया माध्यमातून किंवा अन्य मार्गाने बदनामी कारक अफवा पसरवतील हे आपले लक्षात आल्यास पोलिसांचे निदर्शनास आणून द्यावे. कुर्डूवाडी शहरातील डॉक्टर्स या कोरोना महामारी च्या काळात खरोखरच देवदूत म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे डॉक्टर च्या संदर्भात बदनामीकारक मजकूर किंवा अफवा पसरवणारे यांना पोलिसांचे निदर्शनास आणुन द्यावे ( सी.व्ही.केंद्रे)
सहा.पोलीस निरीक्षक असे अवाहन केले आहे
stay connected