आष्टी तालुक्यातील भारतीय स्टेंट बॅंकेच्या शाखेने थकीत पीक कर्ज असणारे शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते पुर्ववत चालू करण्याची तहसीलदार यांच्याकडे मनसेची मागणी
मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांचे तहसीलदार यांना निवेदन
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे खाते भारतीय स्टेंट बॅंकेच्या शाखाधिकारी यांनी पीककर्ज थकीत झाल्यानें होल्ड केलेले आहेत.परतुं गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण देश ग्रस्त असताना पूर्ण लॉकडाऊन असताना असे शेतकऱ्यांचे खाते होल्ड करणं योग्य नसताना सदर बॅंकेच्या शाखाधिकारी यांनी पीककर्ज थकीत असणारे शेतकऱ्यांचे खाते होल्ड केलेले आहेत.सद्धा मोठ्या प्रमाणात महामारी असताना हाताला कामे नसताना जीवन जगणं अशक्य झालेले आहे.यातच आता काही दिवसांत खरीप हंगामातील पेरणी साठी शेतकरी यांना बी-बीयाणे खरेदी करणं शक्य नाही यामुळे ज्या शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहेत ते तात्काळ पूर्ववत चालू करण्यात यावेत जेणेकरून त्यांना मिळणाऱ्या पी एम किसान योजनेचा निधी शेतकऱ्यांना बी-बीयाणे खरेदीसाठी उपयोग होईल यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदार आष्टी यांना निवेदन देवून तात्काळ शेतकऱ्यांचा खाते पूर्ववत करण्याची मागणी केली.
stay connected