*कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा आज स्मृतिदिन... त्यांनी लोकजागृतीसाठी चाळीस वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पाक्षिकाचे " कर्मवीर तपस्या "या नावाने पुनरुज्जीवन करुन बार्शीच्या श्री.शिवाजी शिक्षण मंडळाने आदरांजली अर्पण केली.संस्धेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव,आ.राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी आणि कर्मवीर परिवाराच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.*
.................................................
*आनंदाची बातमी..*
*हजारो कोरोनाग्रस्तांना त्या विळख्यातून मुक्त करणारे बार्शीचे डॉ.संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन झाले..*
.................................................
*खा.ओमराजे,आ.राऊत, जिल्हाधिकारी शंभरकर यांची "मातृभूमी प्रतिष्ठानला भेट*
*"औषध बँक"लवकरच सुरु करण्याचा संकल्प-* संतोष ठोंबरे
ऑक्सिजन सिलेंडर बँकेसारखा उपक्रम सुरु करुन महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवणाऱ्या बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानला खा.ओमराजे,आ.राजेंद्र राऊत आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट दिली.सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त व्हावा, यासाठी प्रशासन करीत असलेल्या नियोजनाची माहिती शंभरकर यांनी दिली. डॉ.बी.वाय.यादव, अरुण बारबोले, गौतम कांकरिया,विनय संघवी, मुरलीधर चव्हाण,अजित कुंकूलोळ, जयकुमार शितोळे, अशोक हेड्डा,प्रा.किरण गाडवे, शहाजी फुरडे-पाटील, इनामदार आदी.उपस्थित होते.यावेळी ठोंबरे व अजित कुंकूलोळ यांनी उपरोक्त संकल्प जाहीर केला.
*-राजा माने*
stay connected