युवा शक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध; २०४७ चा विकसित भारत घडविण्यात युवकांची भूमिका निर्णायक – जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख

 *युवा शक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध; २०४७ चा विकसित भारत घडविण्यात युवकांची भूमिका निर्णायक – जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख*

——————————————

बीड येथे ‘विकसित भारत – युवा संवाद’ कार्यक्रम उत्साहात; आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेतील यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांसह योगा ग्रुपचा गौरव





——————————————

बीड | प्रतिनिधी


विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवा शक्ती सक्षम, आत्मनिर्भर, संस्कारक्षम आणि राष्ट्रनिष्ठ असणे अत्यंत आवश्यक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, युवकांना शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासोबतच सुसंस्कारी आणि राष्ट्रसमर्पित युवा पिढी घडविणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.


भारतीय जनता युवा मोर्चा, बीडच्या वतीने शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी नवगण महाविद्यालय सभागृहात आयोजित ‘विकसित भारत – युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित युवक-युवतींशी संवाद साधत विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे, यावर मार्गदर्शन केले.


यावेळी बीड नगर परिषदेतील भाजप गटनेत्या सौ. सारिकाताई क्षीरसागर आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले. युवकांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचा, जिद्दीचा आणि ऊर्जेचा उपयोग समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.


आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत बीडच्या कन्यांची ऐतिहासिक कामगिरी!


भुवनेश्वर, ओडिशा येथे दि. १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदकाची कमाई केली. श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताने २७-०० असा दणदणीत विजय मिळवत देशाचा गौरव वाढविला. या ऐतिहासिक यशात बीडच्या मोरया क्रीडा मंडळाच्या अदिती सखाराम लोंढे, कीर्ती किरण जाधव आणि दीपाली दिलीप ताठे या तीन खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


या यशाबद्दल तिन्ही खेळाडूंसह मोरया क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक श्री. नितीन येळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशामुळे बीड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे.


तसेच बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करणाऱ्या बीडच्या योगा ग्रुपमधील सर्व सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शिवाजी मुंडे, बीड शहराध्यक्ष अशोक लोढा, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे, मंडळ अध्यक्ष मनोज पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुंदर चव्हाण युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष शुभम कातंगळे युवा मोर्चा सरचिटणीस युवराज वायभासे कल्याण कुलकर्णी, डॉ. थोरात, आघाव सर यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.


कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय आंधळे व युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


युवकांच्या स्वप्नांना दिशा, कर्तृत्वाला संधी आणि संस्कारांना बळ देत २०४७ च्या विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीचा सहभाग अधिक व्यापक करण्याचा निर्धार या युवा संवादातून व्यक्त करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर