सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत क्रेडिटॲक्सेस ग्रामीण व इंडिया फाउंडेशनचा पुढाकार!
कौठा व सोनेवाडी गावात १०० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप; सामाजिक उत्तरदायित्वाचा स्तुत्य संदेश
अहिल्यानगर, दि. १२ नोव्हेंबर २०२६ :
केवळ आर्थिक सेवा देणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या जीवनात आधाराचा हात देणे, हेच खऱ्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. याच सामाजिक जाणिवेतून क्रेडिटॲक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) आणि क्रेडिटॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौठा (ता. नेवासा) आणि सोनेवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दोन्ही गावांतील सुमारे १०० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचा संवेदनशील प्रयत्न करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या आणि वाढत्या महागाईच्या काळात गरजू कुटुंबांना मिळालेली ही मदत त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच दिलासादायक ठरणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला कौठा गावचे उपसरपंच कडुबा मोहिते तसेच सोनेवाडी गावचे सरपंच बाबासाहेब बेरड यांच्या सौभाग्यवती यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गावपातळीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी क्रेडिटॲक्सेस ग्रामीणच्या वतीने विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर कदम, क्षेत्रीय अधिकारी रवींद्र रकटाटे, शाखाधिकारी संजय गवई, अविनाश दासरजोगी, लेखापरीक्षक मंगेश गणगे यांच्यासह समाधान बनकर, विजय पंडित, किरण सकट, प्रतीक्षा डोळसे, सविता वांडेकर आणि कल्याणी मोरे उपस्थित होते.
क्रेडिटॲक्सेस ग्रामीण (ग्रामीण कुटा) आणि क्रेडिटॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून आर्थिक समावेशनासोबतच सामाजिक विकासालाही प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील महिला आणि कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका संस्था सातत्याने पार पाडत आहे.
"व्यवसायासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणे आणि गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे, हाच खऱ्या सामाजिक बांधिलकीचा उद्देश आहे," असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
समाजातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.





stay connected