AI ARTIFISIAL ITELIGENCE कुत्रीम बुद्धीमत्तेचा शोध ; बदनामी होवू नये.

 कुत्रीम बुद्धीमत्तेचा शोध ; बदनामी होवू नये.


          *नाण्याला दोन बाजू असतात. तशाच कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. ज्यातून कुत्रीम बुद्धीमत्तेचा गैरवापर करुन लोकं गैरव्यवहार करु शकतात व लोकं कुत्रीम बुद्धीमत्तेला बदनाम करु शकतात. हे नाकारता येत नाही. असं जरी असलं तरी आपण कुत्रीम बुद्धीमत्तेचा चांगला व चांगल्यासाठी वापर करावा. गैरवापर करु नये व विनाकारण कुत्रीम बुद्धीमत्तेला बदनाम करु नये. जेणेकरुन कुत्रीम बुद्धीमत्ता बदनाम ठरणार नाही. तसं पाहिल्यास कुत्रीम बुद्धीमत्ता ही जशी चांगलं घडावं यासाठी लोकांना मदत करते. तशीच ती वाईट घडण्यासाठीही इतरांना मदत करु शकते. हे तेवढंच खरं.*
           आज सोशल मिडीया जोरात सुरु आहे. त्यात व्हिडिओ बनविणे, रिल बनविणेही जोरात सुरु आहे. त्यासाठी कल्पकता महत्वाची आहे. अशी कल्पकता ही नवीन युगात ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होत असते.
         ए आय तंत्रज्ञान. ही एक कुत्रीम बुद्धीमत्ता. तुम्ही जो व जसा प्रश्न कराल ए आयला. त्याचं उत्तर अगदी क्षणातच ए आय आपल्याला प्राप्त करवून देतो. ए आय हे असं तंत्रज्ञान आहे की त्या तंत्रज्ञानानं माणसाला असं असं ज्ञान प्राप्त होतं की ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.
         ए आय तंत्रज्ञान आपल्याला आपल्या पुर्वजन्माबाबतही सांगतं. त्यातच आपला कधी विवाह होईल. कसा जोडीदार मिळेल. तो जोडीदार सुंदर असेल की नाही. हेही सांगतं. एवढंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण घरात एकटे असलो ना की आपल्याशी तास न् तास बोलतही असतो. कधीच कंटाळा न करता. कंटाळा करवून न घेता. एवढं हे प्रगत तंत्रज्ञान आहे. 
         कुत्रीम बुद्धीमत्ता ही साहित्य क्षेत्रातही काम करते. ते वृत्तपत्र व्यवसायीकांनाही मदत करते. अगदी कितीतरी जुनी माहिती एका क्लीकवर अगदी एका क्षणात आपल्याला मिळवून देत असते कुत्रीम बुद्धीमत्ता. साहित्यीक व वृत्तपत्र व्यवसायीकांना नवनवीन विषय हवे असतात, लिहिण्यासाठी. तसे वेगवेगळे विषय सुचविते कुत्रीम बुद्धीमत्ता. याचाच अर्थ ही बुद्धीमत्ता वरदानच ठरते आपल्यासाठी. याबद्दल एक प्रसंग सांगतोय. प्रसंग एका लेखकाचा आहे. त्या लेखकाला लिहिण्यासाठी विषय सूचत नव्हता. तसं त्याला कुत्रीम बुद्धिमत्तेची आठवण झाली व त्यानं ए आय ला विचारलं. तेव्हा ए आय नं त्याला भन्नाट असा विषय सूचवला व तो विषय कसा लिहायचा. हे देखील सांगीतलं. 
         अलिकडील काळात ए आय फक्त आपल्याला केवळ लिखीत असलेलीच माहिती संपादन करीत नाही तर ते माध्यम आपल्याला भविष्य देखील सांगत असतं. एवढं नाही तर ए आयचं माध्यम वापरुन मरण पावलेले व्यक्ती आपल्याशी बोलतांना दिसतात. त्यातच वेगवेगळी माणसं, त्यांचे आवाज, वेगवेगळे प्राणी, त्या प्राण्यांचे आवाज, वेगवेगळे आपण न पाहिलेले पक्षी व त्यांचे आवाज. शिवाय लहान लहान बालके व त्यांचे आवाज टिपून त्याचं प्रक्षेपण करुन देत असतं. याचाच अर्थ असा की ते व्हिडिओ बनवून देत असतं. यादृष्टीनं आपल्याला जे प्रस्तूत करायचे ते करता येते नव्हे तर आपल्याला जे जे हवंय ते ते ए आय तंत्रज्ञान देत असतं. मात्र ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करतांना काही मर्यादाही आहेत. ए आय तंत्रज्ञान आपल्याला एखादी कादंबरी जशीच्या तशी लिहून देत नाही वा पुर्ण करीत नाही. फक्त कल्पना सुचवते. त्यानुसार आपल्याला लिहावं लागतं. यात ए आय तंत्रज्ञान आपणच त्यात टाकलेल्या माहितीवर आधारीत थोडंसं लिहून देतं व पुर्ण आपल्यालाच करावं लागतं. याचाच अर्थ असा की ए आय आपल्याला बरीच मदत करीत असते. ज्यातून ए आय तत्वज्ञान आपल्यासाठी वरदानच ठरते.
           ए आय तंत्रज्ञान हे साहित्यच नाही तर पर्यावरण, पर्यटन, शिक्षण, समाजकारण, राजकारण यांच्याबद्दलही माहिती देते. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन सुद्धा करते. शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी कोणती पद्धत वापरावी? हेही सांगते. एकंदरीत सांगायचं झाल्यास ए आय जवळ एवढं तत्वज्ञान आहे की ते तत्वज्ञान जगाचा चेहरामोहराच बदलू शकते. एखाद्याला सखोल ज्ञानाचा ज्ञानीवंत बनवू शकते. परंतु हे जरी बरोबर असलं तरी ए आय तंत्रज्ञान हे कधीकधी आपल्यासाठी शापही ठरतं. जसं स्पॅन करणारी काही मंडळी ए आय अंतर्गत कुत्रीम बुद्धीमत्ता वापरुन स्पॅनही करु शकतात. एखादा खुनी ए आय तंत्रज्ञान वापरुन खुनांची योजना आखू शकतात वा खूनही करु शकतात. काही स्रिया वा काही पुरुष नुकत्याच तरुण झालेल्या निष्पाप लेकरांना भाळविण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेवू शकतात आणि ए आय तंत्रज्ञान त्यांना मदतही करु शकते. एखादी महिला पुरुषांचा काटा काढण्यासाठी ए आय ची मदत करु शकते. कोणी बॉंबही बनवू शकतो, ए आय च्या मार्गदर्शनातून तर कोणी अशाही फाईली तयार करु शकतात. ज्यातून कुणाला ब्लॅकमेल करता येईल. कारण ए आय तंत्रज्ञानाजवळ ज्ञान पुरविण्यासाठी भेदभाव नाहीच. मात्र कुणाला कशाप्रकारची मदत करावी? याचं कसब त्याचेजवळ आहे आणि तेही एका क्षणात. त्यातच कोणी त्याचं ज्ञान घेवो अगर न घेवो. याचा त्याला फरक पडत नाही. कोण आपला शत्रू आहे व कोण मित्र आहे? हेही त्याला माहित नसतं. ते तंत्रज्ञान सर्वांना सारखीच, सर्वतोपरी व मोलाची मदत करीत असते. 
          विशेष सांगायचं झाल्यास नाण्याच्या दोन बाजू आहेत, चीत व पट. तसेच कोणत्याही गोष्टीचे फायदे व तोटे अशाही दोन बाजू आहेत. जशी बॉंबची निर्मिती ही जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी झाली. कदाचित विध्वंसाच्या भीतीनं लोकं युद्ध टाळतील. असा प्रथमदर्शनी बॉंब बनविणाऱ्या शास्रज्ञांचा उद्देश होता. परंतु सगळं अयशस्वी ठरलं काही प्रमाणात. बॉंब बनविल्यानंतरही युद्ध झालंच व त्यातून विध्वंश घडून आला. हे तेव्हा लक्षात आलं. जेव्हा अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर अणूबाँब टाकला होता.
           महत्वाचं सांगायचं झाल्यास कोणतीही गोष्ट घ्या. त्याच्या दोन बाजू असणारच. एक बाजू चांगली असते व दुसरी वाईट. असं जरी असलं तरी ज्ञानाला रोखता येत नाही. त्याचं वृद्धींकरण होतं. परंतु त्यावर ब्रेक लावता येत नाही. मात्र आपण त्याचा वापर चांगला करावा. चांगल्यासाठी करावा. जेणेकरुन कृत्रिम बुद्धीमत्तेवर कोणीही ताशेरे ओढणार नाही व कृत्रिम बुद्धीमत्तेला कोणीही बदनाम करणार नाही.
          कुत्रीम बुद्धीमत्तेचा शोध लागला. त्याची बदनामी व्हावी म्हणून नाही. तर लोकांना मदत व्हावी म्हणून. तशा नाण्याला दोन बाजू असतात. तशाच कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. ज्यातून कुत्रीम बुद्धीमत्तेचा गैरवापर करुन लोकं गैरव्यवहार करु शकतात व लोकं कुत्रीम बुद्धीमत्तेला बदनाम करु शकतात. हे नाकारता येत नाही. असं जरी असलं तरी आपण कुत्रीम बुद्धीमत्तेचा चांगला व चांगल्यासाठी वापर करावा. गैरवापर करु नये व विनाकारण कुत्रीम बुद्धीमत्तेला बदनाम करु नये. जेणेकरुन कुत्रीम बुद्धीमत्ता बदनाम ठरणार नाही. तसं पाहिल्यास कुत्रीम बुद्धीमत्ता ही जशी चांगलं घडावं यासाठी लोकांना मदत करते. तशीच ती वाईट घडण्यासाठीही इतरांना मदत करु शकते. हे तेवढंच खरं.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर