भूमाफियांचे षड्यंत्र धुळीस; लोहा येथे ४ जिल्ह्यांतील भीमसैनिकांच्या वज्रमूठ लढ्याला यश, 'विश्वशांती बुद्ध विहार'च्या जागेवर पंचशील ध्वज पुनर्स्थापित!
गद्दार बगलबच्चे आणि स्वयंघोषित पॅन्थर्सना समाज आता धडा शिकवणार; भीमसैनिकांचा लोहा येथे ऐतिहासिक विजय
लोहा (प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे):
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जायकवाडी कॅम्प (पंचशील नगर, लोहा) येथील 'विश्वशांती बुद्ध विहार' या नियोजित जागेवरील फलक आणि पंचशील ध्वज रातोरात नष्ट करून जागा बळकावण्याचा भूमाफियांचा डाव भीमसैनिकांनी आणि सतर्क नागरिकांनी पूर्णपणे हाणून पाडला आहे. तालुक्यातील काही प्रस्थापित भूमाफियांनी समाजकंटकांना हाताशी धरून रचलेले हे कुटील षड्यंत्र उधळत, समाजबांधवांनी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा डौलाने पंचशील ध्वज आणि फलक पुनर्स्थापित करून नवा इतिहास घडवला आहे. या क्रांतिकारी कामगिरीबद्दल संपूर्ण लोहा तालुक्यातून या भीमसैनिकांवर कौतुकाचा वर्षाव होत असून "क्रांतिकारी जय भीम, जय संविधान" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.४ जिल्ह्यांतील भीमसैनिक एकवटले; वंचित बहुजन आघाडीची मोलाची साथया गंभीर विटंबना प्रकरणाची माहिती मिळताच अॅड. पंचशील कांबळे, गंगाधरराव महाबळे, छगण हटकर, सचिन नवघडे आणि नामदेव बुद्धे या प्रमुख भीमसैनिकांनी व सहकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी या अन्यायाविरुद्ध जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात तीव्र आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ नांदेड जिल्हाच नव्हे, तर शेजारच्या तब्बल चार जिल्ह्यांतील हजारो भीमसैनिक आणि बौद्ध बांधव लोहा येथे गोळा झाले. या संपूर्ण लढ्याला वंचित बहुजन आघाडीची मोलाची साथ लाभली. सर्वांनी कायदेशीर आणि संघटित मार्गाने प्रशासनावर दबाव आणत भूमाफियांचे मनसुबे धुळीस मिळवले आणि ही धडक कारवाई यशस्वी करून दाखवली."आता आमचे नेते हेच!" – प्रस्थापित नेत्यांना घरचा रस्ता दाखवणारया कठीण प्रसंगात स्वतःच्या प्राणाची व परिणामांची पर्वा न करता समाजाच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या भीमसैनिकांच्या धाडसामुळे लोहा तालुक्यात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. "संकट काळात धावून येणारे आणि भूमाफियांना चोख उत्तर देणारे हेच आमचे खरे नेते आहेत.
निवडणुकीपुरते स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरवणारे आणि ऐनवेळी गायब राहणारे स्वयंघोषित पॅन्थर्स व प्रस्थापित नेते आता पुरते उघडे पडले आहेत. यापुढे समाजात फूट पाडणाऱ्या अशा भोंदू नेत्यांना चोप देऊन सन्मानित केले जाईल आणि थेट घरचा रस्ता दाखवला जाईल," अशा स्पष्ट आणि स्वाभिमानी भावना तालुक्यातील समाजबांधव आता उघडपणे व्यक्त करत आहेत.भूमाफियांचे दलाल आणि बगलबच्चे आता निशाण्यावर!जायकवाडी कॅम्प येथील विटंबना प्रकरणात समाजबांधवांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी, उलट भूमाफियांची बाजू मांडणारे प्रस्थापितांचे बगलबच्चे आणि दलाल आता पूर्णपणे उघडे पडले आहेत. स्वतःला समाजाचे म्हणवून घेत पडद्यामागून भूमाफियांना साथ देणाऱ्या आणि समाजबांधवांना विरोध करणाऱ्या अशा काही विघातक प्रवृत्तींचे (नगा, आगा, बाखि, बनि) चेहरे समाजाने नीट ओळखले आहेत. "विहाराच्या जागेचे रक्षण करताना ज्यांनी दलाली केली, त्यांना बौद्ध समाज कधीही माफ करणार नाही. अशा लोकांनी आता समाजात फिरणे तातडीने टाळावे, अन्यथा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही," असा संतप्त इशारा यावेळी भीमसैनिकांनी दिला. या ऐतिहासिक लढ्यामुळे लोहा तालुक्यातील भूमाफियांच्या दलालांना मोठा चपराक बसली असून खऱ्या आणि खोट्या नेत्यांमधील फरक जनतेसमोर आला आहे.


stay connected