*दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे विद्यार्थी हैराण; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*देठे वस्तीत अस्वच्छतेचे साम्राज्य; सांडपाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याची मागणी
देवळाली प्रवरा शहरातील देठे वस्ती परिसरात शौचालयाच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांडपाणी वाहून नेण्याची योग्य व्यवस्था नसल्याने ते थेट वस्तीत आणि रस्त्यावर सोडले जात आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या घाणीमुळे नागरिक आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याच कारणामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट देवळाली प्रवरा नगरपरिषद गाठून मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा आरोग्याचा प्रश्न गंभीर होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यावेळी युवराज देठे, साईराज देठे, अर्जुन देठे, गणेश देठे, चेतन देठे, शिवम देठे, साई गडाख या विद्यार्थ्यांसह नगरसेवक दासू पठारे, मनीष देठे आदी उपस्थित होते.


stay connected