*तरुण पिढीने कै .आक्कांचा ( कै . भगीरथी शिवराव थोरवे, शिरीषभाऊ, खुंटेफळ यांच्या आई ) आदर्श घेण्याची गरज*
प्रा.अविनाश भवर, अध्यक्ष द्वारका प्रतिष्ठान
आक्कांच्या जाण्याला आज दहा दिवस पूर्ण होत आहेत, परंतु मी तर म्हणेन आक्कां त्यांच्या कुटुंबातील सर्व समावेशक अस्तित्वाने अमर झालेल्या आहेत. आक्कांचा प्रेमळ,शालीन, सोशिक, सेवाभावी आणि भक्तीयुक्त स्वभावाचा डीएनए आक्कांच्या चारही अपत्यामध्ये आहे. एक आदर्श कुटुंब कसं असावं, एकमेकासाठी सोशिकपणाने आणि सेवाभावाने किती मदत रूप असावं हे शिरीष भाऊ, राजूभाऊ, छबुताई आणि जयाताई यांच्या वर्तनामधून आपल्याला शिकायला मिळते. अक्का या शिरीष भाऊंच्या फक्त आई नव्हत्या तर एक चांगल्या मित्र होत्या, त्यांचे आपुलकीचे आणि खेळीमेळीचे नाते जेव्हा मी पाहतो तेव्हा आम्हालाही या नात्याबद्दल खूप कौतुक वाटते . अगदी शेवटपर्यंत आक्काच्या प्रत्येक भावभावनेची आणि तब्येतीची काळजी या चारही भावंडांनी घेतली, ही काळजी घेत असताना शेवटच्या क्षणापर्यंत अक्का परमेश्वराच्या व गुरुच्या भक्तीमध्ये लीन होत होत्या हे या माऊलीचे व सर्व कुटुंबाचे मोठं भाग्य आहे . परमेश्वर चरणी राहून अक्का त्यांच्या कुटुंबावरती आशीर्वादाचा वर्षाव अनेक काळ करत राहतील ही खरी आशीर्वादाची समृद्धी प्रत्येक कुटुंबामध्ये असायला हवी आहे, असे मला वाटते . आक्कां नी आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख सहन केले, पतीचे अकाली जाणे, एका तरुण नातवाचे अकाली जाणे आणि जावयाचा सुद्धा अकाली मृत्यू, अक्कांनी धिरोदत्तपणे सहन करून कुटुंबाची जबाबदारी सोसिकपणे निभावली ,परंतु मनामधील मायेचा आणि खंबीरपणाचा वसा कधी नष्ट होऊ दिला नाही, याचं खरं कारण म्हणजे त्यांची परमेश्वराच्या वरती असलेला विश्वास आणि समर्पन .
आक्कांनी दुःखांच्या मालिकेमध्ये जसा कुटुंबाला आधार दिला तसा कुटुंबातील सर्व सदस्यांनी ही आक्कां भोवती मायेचे कुंपण तयार करून तीचे अस्तित्व ताजेतवाने ठेवले, हा ही एकमेकाप्रती समर्पणाचा उच्च आदर्श आहे . चढउतारामध्ये, दुःखांच्या मालिकेमध्ये व यश अपयशाच्या चढउतारामध्येही कुटुंबातील एकमेकांनी
एकमेकाप्रति विश्वास ठेवून पुढे चालायला हवं हे या कुटुंबापासून आपल्याला शिकायला मिळतं, आजच्या तरुण पिढीमध्ये डिव्होर्सचा आणि काडीमोड चे प्रमाण हे खूप वाढताना दिसत आहे कारण की कुठलीही, जबाबदारी नको,सहनशील ठेवायची नाही,कोणीही कोणाचे सहन करायचे नाही, एकमेकाची जबाबदारी स्वीकाराची नाही, आपण आणि आपला स्वार्थ याच्या पलीकडे एकत्र कुटुंब पद्धतीच्या जबाबदारी,मर्यादा आणि त्यातून मिळणारी सुरक्षा ही कोणाला नको आहे, त्यामुळे मातृदेवो भव, पितृदेवो भव, पतिव्रता, पत्नीनिष्ठा हे मूल्य आजच्या तरुण पिढीने सोडलेले दिसत आहेत आणि त्यामुळे विभक्त कुटुंब, नात्यांचा काडीमोड याने समाज व्यवस्थेला एक विकृत दिशा दिलेली आहे. अशा भयावह कुटुंब व्यवस्थेच्या वादळामध्ये आक्का आणि थोरवे परिवारांचं कौटुंबिक वातावरण आपल्या सर्वांना दिशा दाखवणारे आहे.यापासून तरुण पिढीने आदर्श घेऊन सोशिकपणा, भावनिकता, प्रेम, सहनशीलता आणि जवळच्या व्यक्तीबद्दल, कुटुंबातील व्यक्तीबद्दल सद्भाव ठेवून, प्रत्येकाच्या परिवर्तनाच्या आशावाद बाळगून कुटुंब आणि नाते ही टिकवायला पाहिजे . हीच खरी आक्कांना श्रद्धांजली ठरेल .🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


stay connected