डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.








 कोरेगाव भीमा : अल-अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाव भीमा येथे ‘महाराष्ट्र सायबर अँड क्विक हिल फाऊंडेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमा’ अंतर्गत ‘ CYBER SAFETY AWARNESS PROGRAM’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी CYBER WARRIORS कशफ तांबोळी आणि तौफिक मुलानी ,  हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा पहिला नियम म्हणजे “सावध रहा, सुरक्षित रहा.” अनोळखी व्यक्तींचे मेसेज, लिंक, ई-मेल किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवू नका. तंत्रज्ञानाचा योग्य, जबाबदार आणि सुरक्षित वापर करा. स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींनाही सायबर सुरक्षेबद्दल जागरूक करा. यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

“सोशल मीडियावर फोटो, लोकेशन किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष काळजी घ्या. कोणतीही संशयास्पद लिंक उघडण्यापूर्वी ती खरी आहे का, याची खात्री करा. ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर छळाचा अनुभव आल्यास घाबरू नका किंवा लपवू नका—ताबडतोब पालक, शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्या.”, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भारत सरकारच्या ' महाराष्ट्र सायबर अँड क्विक हिल फाऊंडेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमाचा' सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूक करणे हा आहे. हे अभियान सध्या देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविले जात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नासिर एम. शेख, सहसचिव ॲड. जाहिद एन. शेख, प्राचार्य डॉ. संपत डी. नवले, विभागप्रमुख प्रा. सोनल सातव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अनिल बालाजीराव पांचाळ, प्रा. प्राजक्ता ए . काटे व प्रा. प्रगती टी. नवले यांनी जबाबदारी सांभाळली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये “सायबर सुरक्षा ही केवळ जबाबदारी नाही, तर प्रत्येकाची गरज आहे.” ही जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर