शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिल माफी, आणि मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी हे शासनाचे निर्णय मराठवाड्यासाठी दिलासादायक.. माझा विजय हा सुरेश धस यांना समर्पित.. -- आ. बसवराज पाटील मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योजकता योजनेचा लाभ युवकांनी घ्यावा --- आ.सुरेश धस आष्टीत रंगला सत्कार सोहळा

 शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिल माफी, आणि मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी हे शासनाचे निर्णय मराठवाड्यासाठी दिलासादायक..
माझा विजय हा सुरेश धस यांना समर्पित.. 
-- आ.  बसवराज पाटील
मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योजकता योजनेचा लाभ युवकांनी घ्यावा 
--- आ.सुरेश धस 
आष्टीत रंगला सत्कार सोहळा







आष्टी ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी शेती सिंचनासाठी वीज बिल माफी आणि आगामी काळात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी येणार आहे हे निर्णय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत  दिलासादायक असून विधानपरिषद निवडणुकीतील माझा विजय हा आमदार सुरेश धस यांच्या कल्पक रणनीतीला समर्पित करतो असे प्रतिपादन धाराशिव बीड तथा लातूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ धाराशिव चे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील पाटील यांनी केले तर आमदार सुरेश धस यांनी आमदार बसवराज पाटील यांनी दर सहा महिन्याला नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका सदस्यांची बैठक आयोजित करून त्यांच्या समस्या दूर कराव्यात असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले नवनिर्वाचित आमदार हे अनुभवी राजकारणी असून त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता अशी त्यांची ख्याती असल्यामुळेच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे वरिष्ठ सभागृहातील सदस्य असल्यामुळे नगरपरिषदांचे नगरपंचायतींच्या नगरपालिकांच्या समस्या या त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासून दर सहा महिन्यांनी प्रत्येक नगरपंचायत नगरपरिषद येथे भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घ्यावी आणि नगरसेवकांच्या  अडचणी सोडवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे आमदार बसवराज पाटील यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय संपादन केला आहे त्यांना महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांच्या विश्वासावर बसवराज पाटील यांना मतदान केले आहे असे सांगून महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिकारी निर्णय ठरणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योजकता योजने चे ऑनलाईन फॉर्म सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ भरून लाभ घ्यावा या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने साडेचार हजार कोटी रुपये तरतूद केली आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आष्टी येथे आमदार सुरेश धस यांनी नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके माजी आमदार बदामराव पंडित बाबुराव पोटभरे राजाभाऊ मुंडे डॉक्टर स्वरूप सिंह हजारी सहल चाऊस हरवून इनामदार विठ्ठलराव बडोले रामराव गीते दिलीप भालेराव शेख निजाम मोईन मास्टर परशुराम गुरखुदे शेख मुजीब रणवीर पंडित आदी उपस्थित होते उपस्थित होते पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने अत्यंत लोकहिताचे शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून 36000 कोटी रुपयांचे कर्जमाफी शेतकऱ्यांना शेतीसाठी विज बिल माफी त्यामध्ये चाळीस हजार कोटी रुपये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्यासाठी हक्काचे आणि आणि अतिरिक्त 32 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होणार आहे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरणार आहेत  अशा प्रकारचे निर्णय यापूर्वीच्या सरकारने घेतलेले नाहीत असे सांगत निवडणुकीच्या विजयाचे श्रेय आमदार सुरेश धस यांना समर्पित करतो कारण त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे बीड जिल्ह्यात केवळ एक मत माझ्या विरोधात जाऊन 303 मते मला मिळाली आहेत त्यामुळे माझ्या विजयाचे सर्व श्रेय आमदार सुरेश धस यांना देत असल्याचे सांगितले यावेळी बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की दुष्काळ आणि अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नगरपंचायत आणि नगरपरिषद क्षेत्रामध्ये लाभ मिळत नाही यावर ठोस उपाययोजना करून या क्षेत्रातही शासनाच्या मदतीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी नवनिर्वाचित आमदारांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले माजी आमदार बदामराव पंडित यांनी महायुती शासनातील शेतकरी हिताचे प्रश्न नवनिर्वाचित आमदारांनी प्रभावीपणे मांडावीत असे आवाहन केले यावेळी बोलताना बहुजन विकास मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी तडाखे बंद भाषणामध्ये गोरगरिबांचा नेता सर्वांना न्याय देणारा नेता म्हणजे आमदार सुरेश धस आहेत असे सांगितले

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर म्हणाले की, “आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही मते दिली. त्यांच्यासारखा सक्षम सारथी आणि पाठीराखा मिळाल्याने विकासाची दिशा अधिक मजबूत झाली आहे.”

ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, “उगवत्या सूर्याप्रमाणे त्यांचे नेतृत्व आहे. माणसे जोडण्याची चांगली पारख सुरेश धस यांना आहे. आता पुढील काळात वारसा नव्हे, तर काम आणि नेतृत्वाची क्षमता पाहून नेतृत्व निवडले जाते,” असे मत व्यक्त केले.

माजी आमदार बदामराव पंडित यांनीही आमदार धस यांचा ‘लोकनेते’ असा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. नगरसेवक व नगराध्यक्षांना मानधन मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवार बसवराज पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

“धस मंत्री होईपर्यंत फेटा बांधणार नाही”

रामराव गिते यांनी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास व्यक्त करत, “सुरेश आण्णा धस जोपर्यंत मंत्री होत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही,” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाला मिळणारा जनसमर्थनाचा हा मोठा दाखला असल्याचे त्यांनी सांगितले


या कार्यक्रमास  आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी मंत्री बदामराव आबा पंडित साहेब,  मा. बाबुराव पोटभरे साहेब (बहुजन विकास मोर्चा), मा. राजाभाऊ अण्णा मुंडे (जेष्ठ नेते), मा. डॉ. स्वरूपसिंह हजारी, मा. सहालभाई चाऊस (माजलगाव नगरपरिषद), मा. हरुण ईनामदार (केज नगरपरिषद), मा. विठ्ठलराव बडोले (संचालक, मु. कारखाना), मा. प्रकाश आष्टे (माजी गटनेते), मा. दिलीप भालेराव (जिल्हाध्यक्ष अनुसूचित मोर्चा, धाराशिव),  मा. रामराव गीते, हुले आप्पा, मा. मोईन मास्टर (ज्येष्ठ नगरपरिषद नेते), मा. निजामभाई (बीड, नगरपरिषद), सौ. प्रेमलताताई पारवे (नगराध्यक्षा, बीड), सौ.  संगीताताई बनसोड (केज),मा. शेख मुजीब भाई, मा. परशुराम गुरखुदे,  श्री. बाळासाहेब साहेब जाधव (धारूर), श्री. शेषेराव बापू जगताप (वडवणी), रणजीतसिंह पंडित,श्री. रोहिदास गाडेकर (शिरूर), मा. झिया बेग, मा. राजू जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर