दुर्गम व डोंगरी भाग असलेल्या आष्टी मतदारसंघाच्या विकासासाठी काँक्रीट रस्त्याचे जाळे निर्माण होणे आवश्यक - बापुसाहेब डोके AhilyaNagar News

 दुर्गम व डोंगरी भाग असलेल्या आष्टी मतदारसंघाच्या विकासासाठी काँक्रीट रस्त्याचे जाळे निर्माण होणे आवश्यक - बापुसाहेब डोके





अहिल्यानगर ( प्रतिनिधी ):-  कल्याण विशाखापट्टणम, अहिल्यानगर - सोलापूर हैदराबाद व अहिल्यानगर जामखेड या राष्ट्रीय महामार्गास व अहिल्यानगर - धामणगांव बीड आणि शेवगांव - बारामती या राज्य मार्गांना जोडण्यासाठी नविन रस्ते विकसित करावेत अशी मागणी पुन्हा नव्याने केली आहे. यापैकी अहिल्यानगर धामणगांव बीड व मांदळी धानोरा श्री क्षेत्र वृध्देश्वर (घाटशिरस) देवराई रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यानी ग्रीन सिग्नल दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश चिटणीस बापुसाहेब डोके यांनी दिली.

       याबाबत अधिक माहिती देताना श्री बापुसाहेब डोके यांनी सांगितले की, मतदार संघातील रस्त्यासाठी वारंवार नविन रस्ते विकसित करण्यासाठी मी मागणी करत आहे. आष्टी मतदार संघ हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. या मतदारसंघाची रचना ही दक्षिण, उत्तरेस व पूर्वेस काही भाग अहिल्यानगर जिल्हा आहे व उर्वरित  पाटोदा व शिरूर तालुक्याचा भाग आहे. अशा रचनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्याचा मोठा विकास झाला आहे परंतु मध्यभागी येणाऱ्या आष्टीचा तेवढाच विकास झाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आष्टी मतदार संघातील दुर्गम व डोंगरी भाग हे आहे. या मतदार संघात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, अनेक पर्यटन स्थळ आहेत परंतु रस्त्याअभावी प्रगती वर्षानुवर्षे ठप्प झाली आहे. या बाबत बापुसाहेब डोके यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग व अहिल्यानगर - जामखेड हा राष्ट्रीय महामार्ग आष्टीतुन जातो व अहिल्यानगर -धामणगांव - बीड व पाथर्डी - कडा - बारामती हे राज्य मार्गही आष्टीतुन जातात परंतु असे जरी असले तरी अंतर्गत मतदार संघात अपेक्षित विकास झाला नाही. यासाठी समृद्धी महामार्ग व अहिल्यानगर - सोलापूर क्र. ५६१ A व अहिल्यानगर - विशाखापट्टणम क्र. ६१ व अहिल्यानगर - जामखेड क्र. ५६१ हे राष्ट्रीय महामार्ग जावूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. या साठी बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यांना जोडणारा अहिल्यानगर - धामणगांव बीड हा मार्ग आहे. या मार्गाला जोडण्यासाठी नविन मार्गाची मागणी केली आहे. यामध्ये

सोलापूर रोड पासुन वाटेफळ - लोणी ( सय्यदमीर)- चिचोंडी पाटील - दौलावडगांव ते मराठवाडी हा ४० कि.मी चा रस्ता विकसित झाल्यास या भागाचा विकास होऊ शकतो व तिन राष्ट्रीय महामार्ग व एक राज्य मार्ग जोडला जातो त्याचप्रमाणे यापुर्वीच मागणी केलेला मांदळी (ता. कर्जत) निमगाव गांगर्डा - वाहिरा - धानोरा - सुलेमान देवळा - सावरगांव श्री क्षेत्र वृध्देश्वर घाटशिरस देवराई हा ६० किमीचा रस्ता विकसित केल्यास लाखो भक्तांची सोय होऊ शकते व दुर्गम भागाच्या विकासास चालना मिळेल तसेच पाथर्डी - धामणगांव - कडा- मिरजगाव- बारामती हा राज्य मार्ग क्र. 157 हा विकसित झाला आहे. परंतु तेवढ्यावर त्याभागातील दुर्गम भागाचा विकास होत नाही म्हणुन या रोडवरून चेकेवाडी - घुमटवाडी, आल्हणवाडी - देवळाली (पानाची), पिंपरी (घाटा) दादेगांव - कडा -टाकळी (अमिया) – रूईनालकोल- वाकी व मिरजगांव या ६२ कि. मी. रस्त्याचा विकास होणे आवश्यक आहे.  दक्षिण-उत्तर असणारे हे तीन रस्ते विकसित झाल्यास खालील गावांचा विकास होवु शकतो. त्यापुर्वी अहिल्यानगर शहरातुन निघणारे रस्ते कसे जातात त्याचा तक्ता व दक्षिणोत्तर रस्ते विकास केल्यानंतर, किती जिल्हे, किती तालुके व किती गांवे जोडली जातात हे दाखवले आहे व त्याखाली नविन विकसीत केल्या जाणाऱ्या रस्त्याचा फायदा किती गावाला मिळेल व यामुळे तिर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, शेती व्यवसाय, विकास, लघु उद्योग व्यवसाय व लांब अंतराची प्रवासाची सोय इत्यादि फायदे होवु शकतात. नकाशामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१, ५६१ व ५६१A असे तीन महामार्ग आहेत व राज्य महामार्ग क्र. २ व १५७ असे दोन राज्यमार्ग आहेत. रस्ता क्र. ३ हा राज्यमार्ग १५७ ला समांतर असा डोंगराळ भागातून आहे. विकसनशिल रस्ते व त्या रस्त्यावर असणारे तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळे खालील प्रमाणे आहेत. रस्ता क्र १ मध्ये वाटेफळ

ते मराठवाडी दरम्यान वाटेफळ, खुंटेफळ, कोयाळ, पिंपळा, काकडेवाडी, खडकव्हाण,लोणी सय्यदमिर, मांडवे ते चिचोंडी पाटील, दौलावडगाव, केळ, पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, पारगाव, भातोडी, बांदखेल, मराठवाडी इ. गावे येतात.

रस्ता क्र. २ - मांदळी - वृद्धेश्वर देवराई या रस्त्यावर  मांदळी, निमगाव गांगर्डा, घुमरी, पिंपरी, घोंगडेवाडी, बोडखा, पारोडी, बोरोडी, वाहिरा, मेहेकरी, पिंपळगाव, खुंटेफळ (साठवण तलाव), पुंडी, धानोरा, कुंभारवाडी, पिंपरखेड, हिवरा, सुलेमान देवळा, भोजेवाडी, म्हसोबावाडी, उंदरखेल, तागडखेल, वेलतुरी, गंगादेवी, शेडाळा, सावरगाव, वृद्धेश्वर, घाटशिरस, देवराई. आदी गावे येतात.या मार्गाने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (घाटशिरस), श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ संजीवन समाधी),

श्रीक्षेत्र मयंबा (मच्छिंद्रनाथ देवस्थान), श्रीक्षेत्र सावरगाव (शनीमहाराज), श्रीक्षेत्र गंगादेवी श्रीक्षेत्र वेलतुरी (वेलजाई माता), हिवरा (रोडागिरी देवस्थान), श्रीक्षेत्र धानोरा (संत बाळदेव महाराज समाधी), श्रीक्षेत्र पुंडी (जगदंबा देवी मंदिर व श्री राम मंदिर),श्रीक्षेत्र वाहिरा (संत शिरोमणी शेख महम्मद महाराज समाधी),श्रीक्षेत्र मांदळी (लालगीर स्वामी मठ व महान योगीतपस्वी श्री आत्माराम गिरी महाराज)

 ही प्रमुख तीर्थक्षेत्रे जोडली जातात. रस्ता क्र. ३ वाकी ते चेकेवाडी हा आहे. या मार्गावर वाकी, फत्तेवडगाव, सराटेवडगाव, नांदा, आनंदवाडी, रुईनालकोल, टाकळी ते अमिया, कडा, डोंगरगण, दादेगाव, महादेववाडी, कोकरेवाडी, कोल्हेवाडी कर्डिलेवाडी, शंकरनगर, पिंपरी, घाटा, लोखंडवाडी, माळीमळा, देवळाली (पानाची), खरकटवाडी आल्हनवाडी, वाघदरा, काकडदरा, पत्र्याचा तांडा, हरीचा तांडा, घुमटवाडी, लडकवाडी, धनगरवाडी, चेकेवाडी आदी गावे येतात. वरील रस्ते विकसित झाल्यास अनेक फायदे होतात व हजारो लोकांना रोजगार मिळेल.या रस्त्यामुळे अहिल्यानगर, बारामती, सोलापूर, धाराशिव, बीड, व संभाजीनगर हे जिल्हे जोडले जातात त्याच प्रमाणे नगर तालुका, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, भूम, जामखेड, पाटोदा, शिरूर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा आदी तालुके जोडले जातात. सदरचे काम अवघडही नाही व सोपेही नाही यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विद्यमान आमदार सुरेश आण्णा धस, माजी आमदार भिमराव धोंडे  व इतर लोकनेत्यांची महत्त्वपुर्ण भूमिका राहणार आहे. विद्यमान आमदार सत्ताधारी असल्याने त्यांना हे काम करणे अवघड नाही असेही  राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश चिटणीस बापुसाहेब डोके यांनी सांगितले.

तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर