नगर शहरातील शांतता भंग करणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करावी - बी. जी. कोळसे पाटील ( माजी न्यायमूर्ती )
अहिल्यानगर येथे काही दिवसांपूर्वी बहुचर्चित घडलेल्या धीरज परदेशी या तरुणाच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील वातावरण अत्यंत संवेदनशील बनले होते. सदर घटना जुन्या वादातून व पूर्ववैमनस्यातून घडली असून, या घटनेला धार्मिक रंग देऊन सामाजिक व धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले, संग्राम भंडारे व काही हिंदुत्ववादी घटकांकडून करण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले की अहिल्यानगर हे केवळ एक शहर नसून ती सुफी, संत, महापुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेची पावन भूमी आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून संपूर्ण देशाला धार्मिक सलोख्याचा ऐतिहासिक संदेश दिला आहे. सर्व धर्मीय नागरिक येथे गुण्यागोविंदाने आणि एकमेकांच्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होत आले आहेत. पण गेल्या दोन-तीन वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर असे लक्षात येते की या शहराला राजकीय स्वार्थासाठी स्थानिक आमदार संग्राम जगताप आणि काही तथाकथित हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. यापूर्वी देखील गंगा उद्धान नमाज प्रकरण, बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण वाडीत मुस्लिम महिलाने गोमांस फेकल्याची अफवा, राज चेंबर्स प्रकरण, गामा भामानगरे हत्याकांड प्रकरण. असे दहा हुन अधिक गंभीर प्रकरणामध्ये स्वतः आमदार विशिष्ट समाजाच्या विरोधात वातावरण दूषित करण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आता काही दिवसांपूर्वी धीरज परदेशी यांची झालेली हत्या नंतर केलेले आमदारांचे रास्ता रोको आंदोलन दरम्यान जहाल चितवणीखोर भाषणे. कपाळाला टिळा लावला म्हणून धीरजची हत्या, आरोपींचे पाकिस्तान, फिलिस्तीन कनेक्शन, धीरज आमचा हिंदू धर्म रक्षणाचा काम करीत होता म्हणून त्याची हत्या झाली अशी बनवाबनवी राजकीय स्टंट करून समस्त मुस्लिम समाजाला व अहिल्यानगर शहराला गालबोट लावण्याचे व धार्मिक सलोखा खराब करण्याचे काम आमदारांनी केल्याचे दिसून येत आहे. धीरज परदेशी हत्यानंतर पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे जी आरोप आमदारांनी केले होते ते सर्व बिनबुडाचे आणि खोटे होते हेही सिद्ध झाले आहे. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही संविधान विरोधी काम करत असेल तर तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार नाही असेही पाटील म्हणाले तवारीत आमदाराला या पदावरून काढून टाकावे असे आव्हान राज्य शासनाला करण्यात आले. लवकरच याबाबत मी स्वतः नगर शहरातील सामान्य लोकांशी संवाद करून यावर फॅक्ट स्टॅंडिंग, सत्यशोधन समिती स्थापन करून अहवाल बनविण्याचे काम करू असेही कोळसे पाटील यांनी त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील समस्त मुस्लिम बांधवा तर्फे किरण काळे यांचा सन्मान.
अहिल्यानगर शहरात दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, अफवांना बळी पडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेषतः अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याच्या चौकटीत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच सत्य समोर आणण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत झाली. याबाबत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने अंजुम इनामदार यांनी पोलीस अधीक्षकांचे जाहीर आभार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण काळे यांनीही अत्यंत संवेदनशील परिस्थितीत सामाजिक सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा धार्मिक तेढीला बळी न पडता सत्य परिस्थिती समोर यावी, शहरात दंगल किंवा हिंसाचार होऊ नये आणि सर्व समाजांनी संयम राखावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
अशा नाजूक परिस्थितीत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे मत मुस्लिम प्रसनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फकृद्दीन यांनी व्यक्त केले.
शांतता, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. किरण काळे यांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची प्रतीकात्मक पगडी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, जमियत उलेमा हिंद हाफिज मुबशशीर, इक्बाल शेख सर, हाफिज अजमतुल्लाह खान, इब्राहिम यवतमाळ वाला, मोईन शेख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



stay connected