लोह्याचे भूमिपुत्र माधवराव बोडके यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेडच्या कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती

 लोह्याचे भूमिपुत्र माधवराव बोडके यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेडच्या कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती




लोहा :-चंद्रकांत वाघमारे 


 लोहा शहरातील मराठ गल्ली भागात राहणारे लोह्याचे भूमिपुत्र माधवराव संतोबा पाटील बोडके यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी नुकतीच पदोन्नती झाली. 

                 विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संस्थेचे माजी अध्यक्ष कै. संतोबा पाटील बोडके यांचे सुपुत्र माधवराव बोडके यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण लोहा शहरातील कै. नळगे विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी नांदेड शहरातील नामांकित शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा औरंगाबाद (संभाजीनगर) येथे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी  निवड झाली. त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केल्यानंतर सन १९९१ मध्ये त्यांची मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात अभियंता म्हणून नियुक्ती झाली. १९९४ मध्ये सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती झाल्यानंतर १९९८ मध्ये उमरी येथे उपअभियंता म्हणून बदली झाली. तेथून माधवराव बोडके यांची दि. २५ जून रोजी नुकतीच नांदेड विभागात कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती झाली. तसेच मागील कांहीं कालावधी पासून ते परिसर अभियांत्रिकी कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ते विराजमान आहेत.

            त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे लोहा शहरातील अनेकांकडून तसेच पत्रकार संघाकडून नांदेड येथील कार्यालयात मन्याड परंपरेनुसार खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार शिवराज पाटील पवार, प्रदीप कांबळे, अंबादास पवार, शिवराज दाढेल, संजय कहाळेकर, विनोद महाबळे, उद्योजक जसबीरसिंग हुंदल, अनिल शिनगारे, अक्षय चव्हाण, जगदीश जानगर व प्रथमेश कळसे सह बहुसंख्येची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.