श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाला भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांची सदिच्छा भेट
आष्टी, प्रतिनिधी : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री बडे बाबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
त्यानंतर त्यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या गोशाळेला भेट देऊन तेथील व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. गोशाळेतील स्वच्छता, गायींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच त्यांच्या संगोपनासाठी ट्रस्टकडून घेतली जाणारी विशेष काळजी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
गोसेवा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची परंपरा असून अशा पद्धतीने नियोजनबद्ध आणि सेवाभावी वृत्तीने गोशाळा चालविणे हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.


stay connected