आष्टा हरिनारायण यात्रेत आ. सुरेश धस यांचा ढोलवादनाचा जलवा **************** व्हिडिओ मिलियन व्ह्यूजसह सोशल मीडियावर व्हायरल

 आष्टा हरिनारायण यात्रेत आ. सुरेश धस यांचा ढोलवादनाचा जलवा
****************
 व्हिडिओ मिलियन व्ह्यूजसह सोशल मीडियावर व्हायरल

*****************





आष्टी (प्रतिनिधी)


आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण येथे सुरू असलेल्या यात्रा महोत्सवात आमदार सुरेश धस यांचा अनोखा आणि पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला. आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या आ. धस यांनी पालखी प्रदक्षिनेदरम्यान ढोल हातात घेत तालबद्ध व जोशपूर्ण वादन करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या ढोलवादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, विविध प्लॅटफॉर्मवर त्याला मिलियन व्ह्यूज मिळाल्याची चर्चा रंगली आहे.


यात्रेनिमित्त आ. धस यांनी आपल्या बालपणीच्या मित्रांची भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वामींच्या पालखी प्रदक्षिनेदरम्यान लेझीम पथक आणि ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.


याचवेळी आ. सुरेश धस यांनी ढोल हाती घेत जोशपूर्ण व तालबद्ध वादन केले. उपस्थितांनी हा क्षण मोबाईलमध्ये टिपला आणि काही वेळातच त्याचे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले. त्यानंतर हा व्हिडिओ मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.


राजकीय व्यासपीठाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये सामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळणारे नेतृत्व म्हणून आ. सुरेश धस यांची ओळख आहे. यात्रा महोत्सवातील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या ढोलवादनाच्या अंदाजाने पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर