शहर व तालुक्यातील विविध योजना तातडीने राबवा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
नाशिक | विशेष प्रतिनिधी
शहर व तालुक्यातील विविध शासकीय योजना तातडीने व प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती आणि महाराष्ट्र मुस्लिम महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी सांगितले की, राज्यभर 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना', सिंगल फेज व थ्री फेज वीज जोडणी, आदिवासी पाडे व ग्रामीण भागातील वीज आणि रस्ते, सरकारी नोंदीतील तसेच शिव व गावठाण रस्त्यांसह विविध विकास योजनांची अंमलबजावणी दप्तरदिरंगाई न करता तातडीने करण्यात यावी.
ते म्हणाले की, गरजू शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना दर्जेदार शेत व पाणंद रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभाग, अधिकारी आणि स्थानिक समित्यांच्या सहकार्याने या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध मूलभूत सुविधांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन उभारले जाईल.
बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष अकीलबाबा शेख, उपाध्यक्ष सुरेशदादा कटके, राशीद शेख, येवला तालुकाध्यक्ष नवनाथ आव्हाटे, उपाध्यक्ष गोरख कमोदकर, निलेश कापसे, समीर सैय्यद, उमेश पुरे, नवीद अन्सारी, कासीम अन्सारी, येवला शहराध्यक्ष वसीम अन्सारी, संघटक सचिव सिद्धीक अन्सारी, पाराजी गुडघे, उल्हासराव दिवटे, सुभाषराव लभडे, प्रकाश लभडे, एकनाथ माळी, भिमराव खळे, पप्पू लभडे, रावसाहेब मोरे, अण्णा माळी, दामू माळी, राजेंद्र माळी, अ. हमीदबाबा मोमीन, रशीदबाबा अन्सारी, साजिद अन्सारी, रेहान शेरूभाई मोमीन, ईरफान शाह, आदिल शेख, अजमत पटेल, असलम शेख, संजय संत, नाना पिंपळे, राजेंद्र संत, जनार्दन कटके, नवनाथ कमोदकर, मोबीन मुलतानी, अरबाज मोमीन, हुसेनहाजीबाबा कुरेशी, अ. कादिर कुरेशी, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, आदिल अन्सारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


stay connected