गांधी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 37वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जवाहरलाल भंडारी यांनी विद्यापीठ विषयी बोलताना पुढील माहिती दिली की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे नाशिक येथे मुख्यालय असलेले एक प्रमुख मुक्त विद्यापीठ आहे १ जुलै १९८९ रोजी स्थापित झालेले हे विद्यापीठ विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त असून , ग्रामीण भागातील आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत उच्च व व्यावसायिक शिक्षण पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे,विद्यापीठाविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे मुख्यालय 'ज्ञानगंगोत्री', गोवर्धन, गंगापूर धरण, नाशिक येथे निसर्गाच्या सानिध्यात आहे, विद्यापीठाचे मुख्य उद्देश ज्यांना नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना लवचिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देणे विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू आहेत त्यामध्ये पदवी (B.A., B.Com, B.Sc), पदव्युत्तर (M.A., M.Com, MBA), पदविका (Diploma) आणि प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहे , विद्यापीठाचे नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रात ८ विभागीय केंद्रे नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर आणि महाराष्ट्रात १७०० हून अधिक अभ्यास केंद्रे कार्यरत आहेत, विद्यापीठाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे डिजिटल पदव्यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणारे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे, तसेच, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठ ऑनलाइन पदवी कार्यक्रमांचेही आयोजन करत असते,अधिकृत माहिती, प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रमांची सविस्तर यादी पाहण्यासाठी YCMOU अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्यावी, अशी प्राचार्यांनी माहितीमध्ये सांगितले,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रोफेसर डॉ अशोक कोरडे यांनी प्रास्ताविक त्यामध्ये अभ्यास केंद्रात चालवली जाणारे विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम या विषयी माहिती दिली, त्यांनी असे सांगितले की महाराष्ट्रातील सर्वात जास्त अभ्यासक्रम असणारे महाविद्यालय म्हणून गांधी महाविद्यालय कडा याचा विद्यापीठ स्तरावर उल्लेख होतो, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे, श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या संस्थेचे गांधी महाविद्यालय कडा येथे पदवीमध्ये बीए, बीकॉम, बीएससी , बीलीब,ग्रंथालय शास्त्र, तसेच पदव्युत्तर विषयामध्ये एम एस सी रसायनशास्त्र ,वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, आणि गणित हे विषय सुरू आहेत, तर ह्युमिडिटीमध्ये मराठी, इंग्रजी ,अर्थशास्त्र ,लोकप्रशासन, इतिहास, एम लीब, इत्यादी अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू आहेत, तर वाणिज्य शाखेत एम कॉम आणि एमबीए हे अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू आहेत,, महाविद्यालयातील सर्व प्रवेश 15 जुलैपासून सुरू होणार आहेत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रवेश घ्यावा , प्रवेश मर्यादित आहेत, याची नोंद घ्यावी,
एस के गांधी महाविद्यालय कडा येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ जवाहरलाल भंडारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, निमित्ताने महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ अशोक कोरडे, प्रोफेसर डॉ अनिल गर्जे, प्रोफेसर डॉ तुकाराम गोंदकर, प्रोफेसर डॉ योगेश रसाळ,प्रोफेसर डॉ श्रीकांत मगर, प्रोफेसर डॉ आशिष कटारिया, प्रोफेसर डॉ रमेश आबदार, प्रोफेसर डॉ उद्धव चव्हाण, डॉ जमीर सय्यद, प्रोफेसर डॉ शिवाजी भोसले, प्रोफेसर डॉ इनुस सय्यद, प्रोफेसर डॉ शिवराज पाताळे, श्री विठ्ठल पालवे, प्राध्यापक डॉ गोरक्षनाथ शिंदे, श्री सुनील लोमटे, श्री ज्ञानेश्वर खंदारे, प्राध्यापक सचिन ढगे, डॉ प्रशांत मेहेर,प्रोफेसर डॉ किशोर चौधरी, प्रोफेसर डॉ पांडुरंग अनारसे, डॉ अण्णासाहेब शेळके, प्रोफेसर डॉ चंद्रशेखर तळेकर, श्री बेलेकर मामा, श्री अशोक खाडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते ,


stay connected