जनता विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
धानोरा / प्रतिनिधी -
जनता विद्यालय धानोरा येथे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव---ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपत जनता विद्यालय, धानोरा येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी आदिती अंकुश गायकवाड सोहम शरद थोरवे स्वराली देविदास गायकवाड समर्थ गणेश काळे , उजेर तनवीर सय्यद शुभ्रा शरद पवार पंकजा पांडुरंग पांडुळे या विद्यार्थ्यांचा व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी खुशी दादासाहेब गव्हाणे व सफा निजाम पठाण यांचा सत्कार करण्यात आला . सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना दादासाहेब गव्हाणे यांच्यातर्फे रोख बक्षीसे देण्यात आली .विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना, “विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सय्यद अब्दुल भाई, सचिव विजयकुमार आण्णा बांदल तसेच संस्थेचे सन्माननीय व्यवस्थापक विशाल भैया बांदल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.कार्यक्रमाला प्राचार्य शिवाजीराव ढोबळे, उपमुख्याध्यापक आयुब सर, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, सरपंच सुभाष शेळके, माजी सरपंच देविदास उदावंत, आजिनाथ शेळके, दादासाहेब गव्हाणे, गणेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पठाण निजाम, ढवळे निता, एकशिंगे अशोक, आर्चना ननवरे, विजयकुमार थोरवे आणि गव्हाणे संतोष यांचाही पालक गणेश काळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निजाम पठाण सर व पवार सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ढवळे मॅडम यांनी मानले.“विद्यार्थ्यांच्या यशानेच विद्यालयाचा गौरव वाढतो आणि ज्ञानदीपाची ही अखंड ज्योत समाजात प्रेरणेचा प्रकाश पसरवत राहते,” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.


stay connected