आष्टीचे सुपुत्र बजरंग बनसोडे यांना मानाचे 'महासंचालक सन्मानचिन्ह' प्रदान; मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव

 आष्टीचे सुपुत्र बजरंग बनसोडे यांना मानाचे 'महासंचालक सन्मानचिन्ह' प्रदान; 
मुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव






आष्टी: प्रतिनिधी 

अंगात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर ग्रामीण भागातील तरुण यशाची कोणतीही 

शिखरे गाठू करू शकतो, हे आष्टी तालुक्यातील सुपुत्र बजरंग आनंदराव बनसोडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त गुन्हे (प्रतिबंधक) म्हणून कार्यरत असलेल्या बनसोडे यांनामहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०२५' प्रदान करण्यातआले. मुंबईचे पोलीस आयुक्त 

देवेन भारती यांच्या हस्ते हा गौरव सोहळा दिमाखात पार पडला.


बजरंग बनसोडे यांचा जीवनप्रवास अत्यंत 

प्रेरणादायी आहे. एका ग्रामीण कुटुंबात 

जन्मलेल्या बनसोडेयांनी आपल्या करिअरची 

सुरुवात 'शिक्षक' म्हणून केली होती. मात्र, 

प्रशासकीय सेवेत जाण्याची ओढआणि खाकी वर्दीचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी जिद्दीने

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश 

मिळवत पोलीस दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला.

मुंबईसारख्या महानगरात पोलीस उपायुक्त 

(गुन्हे प्रतिबंधक) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कामकरताना, त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण 

मिळवण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांना पोलीस सेवाकाळात आजपर्यंत १५६ प्रशस्तीपत्र पोलीस दलाकडून देण्यात आले आहेत.

त्यांची हीच कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पोलीसदलाने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे.


बनसोडे यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले नाही, तर अत्यंत 

क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यातही हातखंडा 

मिळवला. त्यांच्या तपासाचा दर्जा इतका उच्च आहे की, त्यांनीस्वतः तपास किंवा पर्यवेक्षण 

केलेल्या तब्बल ८ प्रकरणांमध्ये न्यायालयाने 

आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच त्यांची निवड केंद्र 

सरकारच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत (NIA)

प्रतिनियुक्तीवर झाली होती. जून २०२२ ते जून २०२५ या काळात त्यांनी 'एनआयए'मध्ये 

कार्यरत असताना देशाच्यासुरक्षेला धोका 

निर्माण करणाऱ्या ३२ दहशतवाद्यांना जेरबंद 

करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आयएसआयएस सारख्या दहशतवादी संघटनेच्या विरोधात राबविलेल्या विशेष

मोहिमेसाठी त्यांना भारत सरकारकडून केंद्रीय

 गृहमंत्री दक्षता पदक २०२४'देऊन गौरविण्यात आलेआहे.

बजरंग बनसोडे यांच्या या यशामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण 

भागातील तरुण, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी बनसोडे यांचे हे यश एक 

दीपस्तंभ ठरले आहे. "कष्टाला पर्याय नाही आणि जिद्द असेल तर 

शिक्षक ते पोलीस उपायुक्त असा प्रवास नक्कीच शक्यआहे," असा संदेशच जणू त्यांनी 

आपल्या कर्तृत्वातून दिला आहे.

या सोहळ्याप्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ 

अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय 

उपस्थित होते. सर्वच स्तरांतून त्यांच्यावर 

अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.