📰 जनता Jack n Jill प्री-स्कूलमध्ये बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता Jack n Jill प्री-स्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. ढोबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक श्री. चव्हाण सर तसेच ‘तेज वार्ता’चे संपादक सय्यद बबलू भाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
फायनल एक्झाम पेपर मध्ये पार्थ मयूर चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
रनिंग स्पर्धेत माहेश्वरी सचिन थोरवे, धनुष बाळू थोरवे (UKG), हर्ष रवी धुमाळ, गार्गी संघर्ष गलांडे (LKG) व सय्यद आयझा तोशिब (नर्सरी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
भाषण स्पर्धेत धनुष बाळू थोरवे (UKG), आरोही नितेश आदमाने (LKG) व सारांश जाधव (नर्सरी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
हस्ताक्षर स्पर्धेत रुबी विजय धुमाळ, आरोही सचिन महापुरे, भाग्यश्री अरुण भालेराव (UKG), सुरेश बाळासाहेब कदम, आरोही नितेश आदमाने (LKG) तसेच साकेत सुदर्शन अडसळे (नर्सरी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अशा प्रकारे सुमारे ४० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
यावेळी श्री. गिऱ्हे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, UKG च्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी आणि CBSE पद्धतीसाठी आवश्यक असे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर दिला जातो, असे त्यांनी नमूद केले.
जनता वसतिगृह शिक्षण संस्थेच्या Jack n Jill Pre-School मध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोणताही विद्यार्थी अभ्यासात कमकुवत राहू नये, यासाठी खेळत-शिकत पद्धतीने अध्यापन केले जाते. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येतो.
याशिवाय, प्रत्येक आठवड्याला शिकवलेल्या अभ्यासावर चाचणी परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुमारे ४५ चाचणी परीक्षा घेण्यात आल्या असून, सर्व परीक्षांचे पेपर पालकांना पाहण्यासाठी स्वतंत्र फाईलमध्ये ठेवण्यात आले आहेत. ही पारदर्शकता जपत पालकांना ते कधीही पाहता येतात. या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती नोंदवून त्यानुसार योग्य मार्गदर्शन केले जाते, असे मडके मॅडम तसेच दळवी मॅडम यांनी सांगितले.
तसेच, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. ढोबळे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असून त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता विकसित होते. असे सांगून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
जनता वस्तीगृह शिक्षण संस्था धानोरा चे सचिव माननीय श्री विजय बांदल अण्णा यांनी सर्व स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.




stay connected