बुध्दीस्ट मायनॉरिटीच्या मिशनच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रामचंद्र वनंजे तर कार्याध्यक्ष पदी बी.बी.गायसमुद्रे यांची निवड

 बुध्दीस्ट मायनॉरिटीच्या मिशनच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रामचंद्र वनंजे तर कार्याध्यक्ष पदी बी.बी.गायसमुद्रे यांची निवड 



*******************

लोहा /चंद्रकांत वाघमारे 

 बुध्दीस्ट मायनॉरिटी मिशनच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रामचंद्र वनंजे तर  कार्याध्यक्ष पदी महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक इजि.बी.बी.गायसमुद्रे यांची निवड सर्वानुमते करन्यात आली. 

                दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी ठाणे येथे बुदिस्ट मायनॉरिटी मिशन ची बैठक राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षेखाली ठाणे येथे पार पडली. बैठकीच्या प्रारंभी तथागत गौत्तम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करन्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्हातून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.

याप्रसंगी सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी रमेश धिवारे यांची बुध्दीस्ट मायनॉरिटी मिशनची भुमिका माडली व मायनॉरिटी शब्द कोठून घेण्यात आला याविषयीची माहिती देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाात्मा गांधी यांच्या मध्ये झालेल्या पुणे करारा विषयी सविस्तर माहिती दिली तर याप्रसंगी अनेकांनी यथोचित भाषने झाली या मतत्वाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्वच जिल्हांची कार्यकारनी घोषीत करन्यात आली. त्यामध्ये  नांदेड जिल्हातील बुध्दीस्ट मायनॉरिटी मिशनच्याजिल्हाध्यक्ष पदी डॉ.रामचंद्र वनंजे तर   कार्याध्यक्ष पदी समाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण प्राप्त तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक इजि.बी.बी.गायसमुद्रे यांची निवड करन्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.