राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह लोकार्पण सोहळा पूर्वतयारी बैठक संपन्न

 राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह लोकार्पण सोहळा पूर्वतयारी बैठक संपन्न





 मराठा सेवा संघ संचलित राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृहाच्या भव्य लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी लोकार्पण सोहळा अभूतपूर्व आणि संस्मरणीय करण्यासाठी बैठकीत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून सुक्ष्म नियोजन करण्यात आले.

सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी संपूर्ण टीम जय्यत तयारी करत आहे. कार्यक्रमस्थळाची व्यवस्था, मान्यवरांचे स्वागत तसेच उपस्थितांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीला मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद तसेच मराठा वधू-वर कक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी व्यक्त केले.

लवकरच होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, हा सोहळा ऐतिहासिक होणार असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.