*बीड तालुका काँग्रेसची शुक्रवारी महत्त्वपुर्ण बैठक*
मोठ्या संख्येने उपस्थित रहा - गणेश बजगुडे पाटील
बीड / अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशाने सुरु असलेल्या "संघटन सृजन अभियान" अंतर्गत बीड तालुका काँग्रेस कमिटीची बैठक दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ११ वाजता शासकीय विश्रामगृह बीड याठिकाणी होत असुन याबैठकीस अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हा निरीक्षक श्रीमती नितु वर्मा मॅडम (नवी दिल्ली) याप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर संघटन निरीक्षक माजी आमदार एम एम शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेंद्रजी घोडजकर, प्रदेश सरचिटणीस श्रीमती विद्याताई पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी बीड तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.


stay connected