शेतकरी संघटनेचे निवासी
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
कडा (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेच्या वतीने १६,१७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता.माजलगांव जि.बीड येथे केले आहे.१०० शिबिरार्थींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांचीही स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे.१६ एप्रिल २०२६ रोजी सर्जक स्वातंत्र्य संघटनेचे प्रमुख अमर हबीब शिबिराचे उदघाटन करून मार्गदर्शन करतील. दुपारच्या जेवणानंतर शेतीमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा? यासंबंधी माजलगावचे तालुका कृषी अधिकारी गणेश दाभाडे आणि गौरव बापमारे माहिती देतील. शेतीमालाचा रास्त भाव की हमीभाव? यासंबंधी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट मार्गदर्शन करतील.तर शेतकरी संघटनेच्या क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले शेतमजुरांच्या समस्येवर आपले मनोगत व्यक्त करतील. प्रत्येक वक्त्यांचे भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तरे होतील.रात्रीच्या जेवणानंतर माजलगाव तालुक्यातील कवींचे शेतकरी कवी संमेलन होणार आहे.१७ एप्रिल २०२६ रोजी शेती अभ्यासक इरफान शेख 'ॲग्रो प्रोडयूसर कंपन्यांची बाजार व्यवस्था' यावर आपले विचार मांडतील. कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य अच्युत बापू गंगणे 'आम्हीच खरे उद्योजक ' याबाबत भुमिका मांडणार आहेत. 'शेतकरी आंदोलनासमोरिल आव्हाने' यावर शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण वडले आपले मनोगत मांडतील.दुपारच्या जेवणानंतर 'रावण राजा राक्षसांचा' या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक शरद तांदळे हे बळीराजा कोण होता? याची ऐतिहासिक संदर्भासह माहिती देतील.रात्रीच्या जेवणानंतर अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर यांचा अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम होणार आहे.१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी औरंगाबाद उच्च न्यायालयातील वकील तथा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे शेतकरी विरोधी कायदे याविषयीची माहिती देतील.तसेच २०१७ च्या शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील सरकारच्या भुमिकेचे सविस्तर विवेचन करतील.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा ऊस दर आंदोलनाचे सरसेनापती रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे.तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रहेमान सय्यद,आष्टी तालुका अध्यक्ष संतोष उर्फ पप्पू गुंड, विष्णू मांढरे उपसरपंच रूईनालकोन यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क महादेव गायकवाड ९५४५२५९५८२ अण्णासाहेब म्हस्के ९८५०७७९७०२


stay connected