*तेजवार्ता चे नांदेड प्रतिनिधी *चंद्रकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार*
*राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने चंद्रकांत वाघमारे सन्मानित*
*नांदेड, प्रतिनिधी /23 एप्रिल:* महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यासाठी 'विजेता मीडिया, पुणे' यांच्यातर्फे 'राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार-2026' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याबद्दल तेजवार्ता चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री. चंद्रकांत पांडुरंग वाघमारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. वाघमारे हे महाराष्ट्र राज्य हंगामी फवारणी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत. या पदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी मोलाचा पाठपुरावा केला आहे.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अनेक गरजू रुग्णांना वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी मदत, वेळप्रसंगी रक्त उपलब्ध करून देणे, तसेच अपघातस्थळी तात्काळ उपस्थित राहून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम त्यांनी केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 10 मे 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत निवारा वृद्धाश्रम हॉल, एस.एम. जोशी फाऊंडेशन समोर, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे. त्याबद्दल वाघमारे यांचे आप्त नातेवाईक व मित्र मंडळ सहकारी सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


stay connected