नायब तहसीलदार पदाचे काम करणे म्हणजे काटेरी कसरत ही काटेरी खुर्ची धारक यांनी यशस्वीपणे सांभाळली-तहसिलदार वैशाली पाटील

 *नायब तहसीलदार पदाचे काम करणे म्हणजे काटेरी कसरत  ही काटेरी खुर्ची धारक यांनी यशस्वीपणे सांभाळली-तहसिलदार वैशाली पाटील*

-------------------





नायब तहसीलदार भगीरथ धारक यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार


आष्टी प्रतिनिधी-  सर्वसामान्य लोकांचे कामे हे महसूल विभागात असतात तहसीलच्या वेगवेगळ्या  विभागात काम करून लोकांचे मने जिंकणे म्हणजे जिक्रीचे काम असून नायब तहसीलदार भगीरथ धारक यांनी काटेरी खुर्ची यशस्वीपणे सांभाळी असून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा तहसीलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांनी गुणगौरव करत सपत्नीक सत्कार केला .आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांची प्रामाणिक व इमानदार सेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले. धारक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

भगीरथ धारक यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाल्याने हा सत्कार सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी भगीरथ धारक यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. ते अत्यंत शांत, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे असल्याचे सांगून त्यांनी कार्यालयातील प्रत्येक टेबलावरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केले व कोणत्याही नागरिकाची कधीही अडवणूक केली नाही, अशी भावना व्यक्त केली.

तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या, “भगीरथ धारक यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. मी बाहेरगावी किंवा मिटिंगला असताना ते फोनवर संपर्क साधून तातडीची कामे पूर्ण करत. सर्वसामान्यांची अडवणूक त्यांनी कधीच केली नाही. आष्टी तालुका मोठा असून नागरिक दूरवरून येतात, त्यामुळे त्यांचे काम झालेच पाहिजे, असे ते सहकाऱ्यांना सांगत.”आष्टी तहसिल कार्यालयात कनिष्ठ लिपिक ते नायब तहसीलदार पदापर्यंत आपल्या कार्याच्या द्वारे वेगळी चूनुक दाखवून आपला आगळावेगळा ठसा भगीरथ धारक यांनी त्यांच्या सेवेतून निर्माण केला होता. 

दि. 31 मार्च 2026 रोजी भगीरथ धारक हे त्यांच्या 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियोतन वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार तहसील कार्यालयात सोमवार दि.३० रोजी सायंकाळी ५ वा. आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त कार्यक्रमात तहसिलदार पाटील बोलत होत्या. यावेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार अश्विनी पडोळे , भगीरथ धारक हे सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलतांना पाटील म्हणाल्या, महसूल विभागात काम करत असताना खुप जिक्रीचे काम असून, या पदावर काम करणे  ही काटेरी खुर्ची धारक यांनी व्यशस्वीपणे सांभाळली असल्याचेही तहसिलदार पाटील यांनी सांगितले.

________


*सत्काराला कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती*


यावेळी नायब तहसीलदार अश्विनी पडोळे,सहाय्यक महसूल अधिकारी सोनटक्के, चव्हाण, अव्वल कारकून वाघमारे मॅडम, वीर मॅडम, महसूल सहाय्यक दिलीप गालफाडे, संजय बहिरवाल, गारुळे, अशोक धोंडे, लिपिक गोरे, ठाणगे, निमसे, लोखंडे, सानप, जाधव, सुशील शिंदे, सुशील क्षीरसागर, बोंदार्ड अक्षय, जायभाय, गुप्ता, मीरा नजान, धोंडे, काळे, गर्जे, पिंपळे, सेवा निवृत्त मंडळ अधिकारी शिंदे, तुकाराम भवर, शरद मेंगडे, जालिंदर वाढरे, दादा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार आदी उपस्थित होते.तहसीलदार वैशाली पाटील यांनी धारक यांच्या कुटुंबासह साधेपणाने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

-------


*‘मी मनापासून जनतेची केली सेवा’ – भगीरथ धारक*


सत्काराला उत्तर देताना भावुक अवस्थेत भगीरथ धारक म्हणाले, “मी अतिशय मनापासून जनतेची सेवा केली. सेवा करताना माणसे जोडण्याचे काम केले. माझ्या मुलीच्या साखरपुड्याला व मातोश्रीच्या निधनावेळी तालुक्यातील नागरिक, ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला स्नेह हीच माझ्या कामाची खरी पावती आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.