आष्टीच्या युवा नेतृत्वाचा राज्याच्या राजकारणात सन्मान ! प्रदीप भैया थोरवे यांची 'आप' युवक प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
आष्टी प्रतिनिधी
अथक परिश्रम, निस्वार्थ जनसेवा आणि प्रबळ संघटन कौशल्याच्या जोरावर आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील धडाडीचे युवा नेते मा. प्रदीप भैया थोरवे यांची आम आदमी पार्टी (आप) युवा आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. संघर्षातून नेतृत्वाकडे: असा आहे थोरवे यांचा राजकीय प्रवास प्रदीप थोरवे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात आमदार सुरेश अण्णा धस यांचे खंबीर कार्यकर्ता म्हणून केली होती. तिथे कामाचा दांडगा अनुभव घेतल्यावर त्यांनी 'आम आदमी पार्टी'मध्ये प्रवेश केला आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. 'आप'मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, त्यांच्यावर सुरुवातीला बीड जिल्हा युवक उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांची प्रदेश संघटन मंत्री म्हणून नियुक्ती झाली. आता त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे पक्षाने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर बढती देऊन राज्याच्या नेतृत्वात मोठी संधी दिली आहे. शेतकरी, शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे कैवारी प्रदीप भैयांची ओळख केवळ एक राजकीय नेता म्हणून नाही, तर संकटात धावून जाणारा 'मदतीचा हात' म्हणून आहे. सोलापूरवाडी येथील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी कधीही त्याचा बडेजाव केला नाही. "स्वतःची ओळख ही स्वतः कष्ट करून कामातून निर्माण करायची, "हा ध्यास घेत त्यांनी नेहमीच शेतकरी, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. मदतीसाठी तत्पर असणारा युवक हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. सामान्यांच्या कार्यकर्त्याचा राज्यस्तरावर गौरव प्रदीप भैया थोरवे यांच्या निवडीची घोषणा होताच आष्टी तालुक्यात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.ग्रामीण भागातील एका सच्च्या आणि कष्टाळू कार्यकर्त्याला राज्याच्या राजकारणात मोठे स्थान मिळाले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. "पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात महाराष्ट्रातील युवकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडणार, "असा विश्वास प्रदीप भैयांनी यावेळी व्यक्त केला. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


stay connected