बीडमध्ये blinkit तर्फे भव्य रोजगार मेळावा; तरुणांसाठी सुवर्णसंधी

बीडमध्ये ब्लिंकिटतर्फे भव्य रोजगार मेळावा; तरुणांसाठी सुवर्णसंधी



बीड | प्रतिनिधी

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीचे प्लॅटफॉर्म (ब्लिंकिट) तर्फे बीड जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई आणि पुणे येथील वेअरहाऊसमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, यासाठी बीडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.



हा रोजगार मेळावा  दि. २८ एप्रिल आणि  दि. २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, बीड शहरातील हॉटेल नीलकमल येथे हा मेळावा पार पडणार आहे. जिल्ह्यातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या मेळाव्यात मुंबई व पुणे येथील वेअरहाऊसमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या १८ वर्षांवरील (SSC/HSC पास) तरुण-तरुणींना सहभागी होता येणार आहे.

आकर्षक पगार व सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० ते १८,००० रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. तसेच, राहण्यासाठी वेअरहाऊसजवळ हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कामाच्या वेळेत एक वेळचे अनुदानित (Subsidised) जेवण देखील दिले जाणार आहे. याशिवाय, वेळेवर पगार, महिन्यातून चार साप्ताहिक सुट्ट्या आणि सणासुदीला विशेष इन्सेन्टिव्ह अशा सुविधा देखील मिळणार आहेत.

मेळाव्याचे वेळापत्रक व ठिकाण
रोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार असून, ठिकाण – हॉटेल नीलकमल, जिल्हा न्यायालयासमोर, नगर रोड, बीड – ४३११२२ येथे आहे.

महत्त्वाची सूचना
इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जाहिरातीत दिलेल्या QR कोडचा वापर करावा.

बीड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी संधी मानली जात असून, मोठ्या प्रमाणावर युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.