मच्छिंद्रनाथ समाधीस्नान सोहळ्यासाठी ५० पोलीस अधिकारी, ५०० स्वयंसेवक अन् ३५० अंमलदार तैनात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली माहीती Machindranath samadhi darshan

 मच्छिंद्रनाथ  समाधीस्नान सोहळ्यासाठी ५० पोलीस अधिकारी, ५०० स्वयंसेवक अन् ३५० अंमलदार तैनात
 सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली माहीती 




आष्टी प्रतिनिधी - "अलख निरंजन"चा जयघोष आणि भक्तीमय वातावरणात आष्टी तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथे बुधवार दि ८ मार्च रोजी 'नाथ संजीवन समाधी महोत्सव २०२६' अंतर्गत मच्छिंद्रनाथांचा पावन समाधीस्नान सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रतून ५० लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून  चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.

आष्टी तालुक्यातील गर्भगिरी पर्वत रांगेत मछिंद्रनाथांची जगातील एकमेव संजीवन समाधी सावरगाव येथे आहे.दरवर्षी गुढीपाडव्याच्या अमावस्येला वर्षांतून फक्त एकदाच समाधी दर्शनासाठी खुली करण्यात येते. मच्छिंद्रनाथ महाराज हे नवनाथांमधील पहिले नाथ आणि योगविद्येचे आदिप्रवर्तक मानले जातात. सावरगाव (मायंबा) येथील डोंगररांगांमध्ये नाथांनी संजीवन समाधी घेतली असून, हे स्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. भगवान दत्तात्रयांचे शिष्य आणि गोरक्षनाथांचे गुरु असलेल्या मच्छिंद्रनाथांनी 'हठयोग' आणि भक्तीमार्गाचा प्रसार केला. त्यांच्या या पावन भूमीत दरवर्षी होणाऱ्या समाधीस्नान सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे, जिथे केवळ दर्शनानेच मनाला शांती आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.



भाविकांना दर्शन सुलभ, सुरक्षित आणि लवकरात लवकर व्हावे, यासाठी ५० पोलीस अधिकारी आणि ३५० पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सरकारी ताफ्याला साथ देण्यासाठी १० खाजगी सुरक्षा रक्षक आणि ५०० स्वयंसेवकही चोवीस तास सेवा देणार आहेत.

देवस्थान व प्रशासनाने जारी केलेल्या 'दर्शन मार्ग नकाशा'नुसार भाविकांसाठी विशेष सोयी केल्या आहेत:फोर व्हिलरसाठी क्रमांक आणि टू व्हिलरसाठी  स्वतंत्र पार्किंग झोन तयार केले आहेत.श्रीक्षेत्र मढीकडे जाणारा मार्ग 'वनवे' (एकेरी) करण्यात आला आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.दर्शन रांगेत पाण्याचे शॉवर, भव्य दर्शन मंडप आणि 'मोफत अन्न छत्रालय' यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

"राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत आणि दर्शन रांगेत शिस्त राखावी," असे आवाहन अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.