आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडविणार ➖ डॉ . संगिता देशमुख
➖➖➖➖➖➖➖➖
नांदेड (चंद्रकांत वाघमारे) ➖ जिल्ह्यातील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केले आहे.म.रा.आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 या संघटनेसमवेत नुकतीच जिल्हा प्रशिक्षण संघ नांदेड येथे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आरोग्य प्रशासन ठामपणे उभे असुन कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न बिनधास्तपणे आरोग्य प्रशासनाला कळवावेत , त्या प्रश्नांची प्रशासन निश्चितपणे दखल घेऊन अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशासन न्याय देईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी आश्वाशित केले .संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांचे व उपस्थित प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत करुन बैठकीला सुरवात करण्यात आली.या बैठकीला आरोग्य प्रशासनाच्यावतीने सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी अशोक निमलवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गंगाधर माशेलवार , वरिष्ठ सहाय्यक सुकेशनी धुताडे , कनिष्ठ सहाय्यक प्रशांत ठोंबरे, हे उपस्थित होते तर संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे, राज्य महासचिव सुरेशदादा आरगुलवार, मराठवाडा विभागीय महासचिव सुनिलदादा वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय खुणे, जिल्हा महासचिव अमित मादळे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पाईकराव, जिल्हा उपाध्यक्ष विजय गोडबोले, सहसचिव कान्होबा कल्याणकर, प्रसिद्धी प्रमुख किरण पवार, निर्मलाताई जोंधळे, शोभाताई ढाकणे, सुनिता मोगरे, वैशालीताई मुन्नेश्वर , हे उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक दिनानाथ जोंधळे यांनी केले तर सुत्रसंचलन सुनील वाघमारे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.


stay connected