Gopinath Munde गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची रक्कम दहा लाख रुपये करावी माजी आ. Bhimrao Dhonde

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची रक्कम दहा लाख रुपये करावी माजी आ. भीमराव धोंडे







कडा ( वार्ताहर) :- शेतात काम करताना शेतकऱ्यांवर वाघ किंवा बिबट्या सारख्या वन्यप्राण्यांनी  हल्ला करुन ठार केले  तर त्या शेतकऱ्याच्या वारसदारांना शासनाच्या वतीने दहा लाख रुपये देण्यात येतात,  त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा ही रक्कम दोन लाखावरून दहा लाख रुपये करावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली.

    आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे आयोजित महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान कार्यक्रमात माजी आमदार भीमराव धोंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आ. साहेबराव दरेकर, तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर,दत्ता वाडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

  पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. 

शेती उत्पादनावर भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला देखील भाव मिळत नाही तसेच शेतात काम करताना अनेक शेतकऱ्यांचा विविध प्रकारे अपघात होतो, यामध्ये सर्पदंश होणे व इतर प्रकारे अपघात होतात. त्यासाठी शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लागू केली परंतु ती त्यासाठी दोन लाख रुपये वारसांना दिले जातात, ही रक्कम अतिशय कमी आहे. ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्यावर वाघ किंवा बिबट हल्ला करून ठार करतो त्या शेतकऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपये दिले जातात त्याप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा रक्कमेत दहा लाख रुपयांपर्यंत पण वाढ करावी. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव दरेकर तहसीलदार वैशाली पाटील व इतरांची भाषणे झाली.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विवाद ग्रस्त प्रकरण निकाली काढून आदेश पारित करणे. फेरफार अदालत घेऊन ७/१२ वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरण करणे विद्यार्थ्यांना रहिवाशी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, रस्त्याच्या नोंदी अभिलेखात नोंद घेऊन ७/१२ वितरित केले.घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वितरित करणे तसेच लक्ष्मी मुक्ति योजना राबविणे विविध अर्थसाह्य योजनेच्या संचिका जमा करणे. ॲग्रीस्टॅक योजना कार्यान्वित करुन मतदान कार्ड वाटप करणे ई-शिधापत्रिका वाटप करणे ई-केवायसी करणे. याप्रसंगी पांडुरंग गावडे, चिंतामण मोरे, रामदास शेंडगे, चंद्रकांत साके,संजय धायगुडे,

सरपंच उध्दवराव मोढवे,सरपंच ज्ञानदेव सासवडे, सरपंच  संजय रक्टाटे ,सरपंच- सागर दरेकर, सरपंच विकास अमृते,सरपंच  योगेश शेळके, सरपंच सौ. सिमाताई भवर, सरपंच संजय विधाते, सरपंच राजेंद्र खुरंगे, अशोक कुताळ, चंद्रकांत शेंडगे, पत्रकार युवराज खटके, राजेंद्र शिंदे,हुसेन सय्यद, निखिल भवर, दादा विधाते , सरपंच  बंकट परकाळे,सरपंच  प्रदिप गव्हाणे, सरपंच भाऊसाहेब गावडे,सरपंच ईश्वर मेटे,दादासाहेब झांजे‌ यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.