कडा येथील चार चिमुकल्यांनी केले महिन्याभराचे रोजे पुर्ण

 कडा येथील चार चिमुकल्यांनी केले  महिन्याभराचे रोजे पुर्ण 



कडा (प्रतिनिधी) मुस्लिम धर्मातील पवित्र असलेल्या रमजान महिन्याचा आरंभ १९ फेब्रुवारी झाला. असून पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी होता‌. हा पहिला रोजा कडा येथील जन्नत नासीर पानसारे वय ११ वर्ष, मन्नत वसीम पानसारे वय ११ वर्ष, असद अनिस मोमीन वय ११ वर्षं, आणि शोयब जहाँगीर सय्यद वय १३ वर्ष, या चार चिमुकल्याने रोजा पुर्ण केला. पहिला रोजा धरला त्यात या चारही चिमुकल्याना काही विशेष त्रास जाणवला नाही. म्हणून त्यानंतर यांनी नियमितपणे दररोज रोजा धरत या महिन्याचा आजचा शेवटचा म्हणजे ३० वा रोजा धरत आज या चारही चिमुकल्यांचे महिन्याभराचे रोजे पुर्ण झाले आहेत. मागील पाच वर्षांपासून रमजानचा महीना उन्हाळ्यात येत आहे. यामध्ये रोजा पुर्ण करणे म्हणजे एक आश्चर्य समजले जाते. त्यात नवल म्हणजे या चिमुकल्यांनी सर्वच ३० रोजे पुर्ण केले. यंदा उन्हाची दाहकता अधिक वाढलेली आहे.अशातच या चार चिमुकल्यांचे रमजानच्या महिन्याभराचे रोजे काटेकोरपणे पुर्ण केल्याने चोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.