पत्रकार अविनाश कदम यांना राज्यस्तरीय जिजाऊ माँसाहेब आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 पत्रकार अविनाश कदम यांना राज्यस्तरीय जिजाऊ माँसाहेब आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान



आष्टी। प्रतिनिधी

मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांना राज्यस्तरीय जिजाऊ माँसाहेब आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई महानंदाच्या संचालिका प्राजक्ताताई सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते अविनाश कदम यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी बापू जंजिरे, जिजाऊ ब्रिगेडच्या उपविभागीय उपाध्यक्षा सुवर्णाताई गि-हे, संयोजक ॲड. सिताराम पोकळे, व्याख्याते तेजश्री मुळे, ॲड. कांतीलाल गव्हाणे, प्रा. दत्ता नरसाळे, सुरेश पवार, डॉ. बाबासाहेब मुटकुळे, लक्ष्मणराव रेडेकर, भास्करराव निंबाळकर, निर्मलाताई सोनवणे, विद्याताई चव्हाण, मनिषाताई चवरे, वर्षाताई शिंदे, अनिताताई निंबोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष आशाताई करांडे आदी मान्यवर उपस्थित होते.तर पत्रकार अविनाश कदम यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करून शुभेच्छा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.