गांधी महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

 गांधी महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा




कडा प्रतिनिधी - गांधी महाविद्यालय कडा येथे जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा, यानिमित्ताने महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ ज मो भंडारी यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे दरवर्षी कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रजाने मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचवले त्यांचे साहित्य मराठीचा सार्थ अभिमान आहे,' विशाखा' काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ,त्यांची,' कणा' व'गर्जा  जयजयकार क्रांतीचा,' या कविता तरुणांच्या प्रेरणास्थान आहेत, असे विचार त्यांनी मांडले,,मराठी विभाग प्रमुख, प्रोफेसर डॉ अनिल गर्जे यांनी प्रास्ताविकामध्ये मराठी भाषा आपल्या भावविश्वाला आकार देते. विचारांना दिशा देते. मराठीचा गौरव म्हणजे आपल्या परंपरेचा आणि प्रगत विचारांचा गौरव होय. या दिनी आपण मराठीचा सन्मान राखण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया त्यांनी असे मत व्यक्त केले, सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ तुकाराम गोंदकर यांनी केले, कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ अशोक कोरडे यांनी मानले, यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मध्ये प्रोफेसर डॉ अशोक कोरडे पा, प्रोफेसर डॉ श्रीकांत मगर, प्रोफेसर डॉ किशोर कोईनकर, प्रोफेसरडॉ किशोर चौधरी, प्रोफेसर डॉ तुकाराम गोंदकर, प्रोफेसर डॉ इनुस सय्यद, प्रा दादा धलपे,  प्रा सचिन ढगे, डॉ प्रशांत मेहेर, प्रा दत्तात्रय हारकर, प्रोफेसर डॉक्टर राजकुमार थोरवे, प्रोफेसर डॉ नरेंद्र गवळी, प्रोफेसर डॉ विष्णुपंत गव्हाणे, प्रोफेसर डॉ आशिष कटारिया, श्री वाल्मीक तरटे, श्री रंगनाथ शिंदे, प्रोफेसर डॉ सुदाम जाधव, प्रोफेसर डॉ शिवाजी जगदाळे, यावेळी प्राध्यापक  कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.