एप्सटीन फाईलमध्ये मोदींचे नाव आल्याचा दावा; माजी IPS अमिताभ दास यांची राष्ट्रपतींकडे पंतप्रधानांना बर्खास्त करण्याची मागणी narendra modi

 एप्सटीन फाईलमध्ये मोदींचे नाव आल्याचा दावा; माजी IPS अमिताभ दास यांची राष्ट्रपतींकडे पंतप्रधानांना बर्खास्त करण्याची मागणी




नवी दिल्ली | प्रतिनिधी

एप्सटीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याचा दावा करत माजी IPS अधिकारी अमिताभ कुमार दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून पंतप्रधानांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बिहार कॅडरचे 1994 बॅचचे माजी IPS अधिकारी आणि ‘बिहार विप्लवी परिषद’चे अध्यक्ष अमिताभ दास यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात अत्यंत गंभीर आणि सनसनाटी आरोप केले आहेत.

पत्रामध्ये त्यांनी दावा केला आहे की अमेरिकन उद्योगपती जेफ्री एप्सटीन यांच्या खासगी बेटावर कथित अनैतिक कृत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी असल्याची माहिती त्यांच्याकडे आहे. या आरोपांच्या आधारे त्यांनी राष्ट्रपतींनी घटनात्मक अधिकारांचा वापर करून पंतप्रधानांना पदमुक्त करावे, अशी मागणी केली आहे.

“मी डोक्यावर कफन बांधलं आहे” – अमिताभ दास

एका सोशल मीडिया चॅनलच्या पत्रकाराने दास यांना विचारले की, “एवढा मोठा आरोप देशाच्या पंतप्रधानांवर करताना भीती वाटली नाही का?”

यावर त्यांनी उत्तर दिले, “मी माझ्या डोक्यावर कफन बांधलं आहे.”

लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याचा दावा

दास यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, भारतासारख्या लोकशाही देशात, विशेषतः महिला राष्ट्रपती असताना अशा गंभीर आरोपांनी घेरलेल्या व्यक्तीने पंतप्रधानपदावर राहणे लज्जास्पद आहे. त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेसाठी तातडीने कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही वादग्रस्त पत्रव्यवहार

अमिताभ दास हे यापूर्वीही अनेक राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेऊन चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही

या पत्रावर राष्ट्रपती भवन किंवा केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र एका माजी पोलीस अधिकाऱ्याने देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदाविरुद्ध अशा स्वरूपाचे आरोप करणे हा अत्यंत वादग्रस्त आणि संवेदनशील प्रकार असल्याचे कायदेपंडितांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.