जि. प. प्राथमिक शाळा अरणविहीरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
कडा/आष्टी (बीड) : प्रतिनिधी – राजू गायकवाड
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणविहीरा, ता. आष्टी, जि. बीड येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी अतिशय उत्कृष्ट व थाटात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. दीप प्रज्वलनाचा मान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. गणेश शिरसाठ सर, अरणविहीरा गावचे सरपंच आण्णा शिरसाठ, तसेच कारखेल खुर्द येथील मान्यवर रघुनाथ घुले शेठ, उपसरपंच लक्ष्मण घुले (पप्पू), युवा नेते महादेव डोके, बाजार समितीचे संचालक बुवासाहेब शेकडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमासाठी मा. उद्धव शिरसाठ (माजी सरपंच), राधाकिसन शिरसाठ, राजेंद्रजी शेठ शिरसाठ यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास शिक्षक बांधवांचीही विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये
अंबादास घुले सर, बाळासाहेब शिरसाठ सर, जाधव सर, पुंडे सर व पुंडे मॅडम,सुदर्शन घुले सर, भारत गावंडे सर, माळी सर, ठोंबरे सर, खान सर,
पोपट कोहोक सर, गुंजाळ सर, भगवान बोडखे सर, संभाजी बडे सर,
किसन शेकडे सर, मुख्याध्यापक शिवा शेकडे सर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका शोभा बोडखे मॅडम यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक कैलास शेकडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी म्हसू शिरसाठ, संदीप शिंदे, तसेच डॉन बॉस्कोच्या पल्लवी शिरसाठ मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी तेजवार्ता न्यूजचे पत्रकार राजू गायकवाड, प्रेम पवळ, शौकत पठाण, सुरेश कांबळे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी मुख्याध्यापक कैलास शेकडे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.
✍️ तेजवार्ता प्रतिनिधी : राजू गायकवाड, कडा आष्टी


stay connected