जागतिक महिला दिनानिमित्त आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने, विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव द्यावा

 जागतिक महिला दिनानिमित्त आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने,
विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव द्यावा 


आष्टी। प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने येत्या मार्च महिन्यात राज्यस्तरीय 'नारी सन्मान आदर्श पुरस्कार २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी आदर्श माता, सामाजिक कार्य, शिक्षण, वैद्यकीय, कृषी, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, वकील, क्रीडा, उद्योजिका, सीईओ, मॅनेजर, अकाउंटंट, क्लार्क, बँकिंग, पत्रकारिता, अध्यात्म, साहित्य, राजकीय, ग्रामसेविका, तलाठी, सरपंच, आशावर्कर, नर्स, अंगणवाडी/बालवाडी सेविका, कृषी सहाय्यक, वायरमन, बचत गट, चित्रपट कला, नर्तिका कलाकार, लेडीज टेलर, आदर्श ब्युटी पार्लर संचालिका, आदर्श गृहिणी, आदर्श सासू, आदर्श सून यासह इतर सर्व क्षेत्रांतील महिलांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इच्छुक महिलांनी आपण करीत असलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, मागील पुरस्कारांच्या छायाचित्रांच्या प्रती, अर्ज यासह आपला प्रस्ताव तयार करून ५ मार्च २०२६ किंवा तत्पूर्वी समक्ष अथवा सुचकामार्फत पुढील वॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. योग्य प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.अधिक माहितीसाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्याशी ९४२३३९५४४४ किंवा ८९७५३५७०५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.तालुक्यातील जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कार्याचा प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव गहिनीनाथ पाचबैल, निसार शेख, ॲड किशोर निकाळजे,राजेंद्र लाड, समीर शेख, अतुल जवणे,सय्यद बबलू,अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, प्रेम पवळ, सोपान पगारे, मारूती सत्रे, आदिनाथ ठोंबरे,अर्थव डाडर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.